रत्नाई कृषी महाविद्यालयात स्वेरी कॉलेजच्या सहकार्याने ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक

रत्नाई कृषी महाविद्यालयात स्वेरी कॉलेजच्या सहकार्याने ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक
संचार वृत्त अपडेट
अकलूज-आनंदनगर
(अकलूज) ता.माळशिरस येथील रत्नाई कृषी महाविद्यालय ,अकलूजला स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ड्रोन समितीने
भेट देऊन ड्रोन प्रात्यक्षिक पार पडले. या वेळी विद्यार्थ्यांसमोर १०लिटर क्षमतेचा ड्रोन सादर करण्यात आला.
ड्रोनच्या साहाय्याने किटकनाशक फवारणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले गेले. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत पिकांचे आरोग्य परीक्षण सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक (NDVI) वापरून पीक स्थिती, पोषण तुटवडा आणि रोगांचे लवकर निदान कसे करता येते, याची माहिती दिली गेली.मृदा नकाशांकन भू-स्थानिक माहिती प्रणाली (GIS) व ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतजमिनीची गुणवत्ता विश्लेषण, मृदाशास्त्राचा अभ्यास आणि नियोजन कसे करावे हे समजावले गेले. ड्रोन सेवा प्रदाता म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करणे. पीक आरोग्य विश्लेषण सल्लागार म्हणून शेतकऱ्यांना सेवा देणे. GIS व मृदाशास्त्र आधारित कृषी सल्ला केंद्र स्थापन करणे इ. उद्योजकीय संधी भविष्यात आहेत.स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे,रत्नाई कृषी महाविद्यालयचे प्राचार्य प्रा.रवींद्र नलवडे तसेच स्वेरीचे डॉ. प्रशांत पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली SVERI’s च्या RGSTC प्रकल्पाअंतर्गत कार्यरत ड्रोन टीमने विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट शेती तंत्रज्ञान, तांत्रिक ज्ञान आणि उद्योजकीय संधी यांची उकल केली. या कार्यशाळेमुळे भविष्यात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक नवउद्योजक तयार होण्याची दिशा निश्चित झाली आहे. प्रा.रविकिरण जाधव, प्रा.शिवभक्ती देशमुख, प्रा.भाग्यश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ड्रोन पायलट उत्तम यलमार, प्रा. मारुती आसबे, प्रा. प्रमोद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा ड्रोन शेतात स्वयंचलितपणे उडत जाऊन ठराविक अंतरावर कीटकनाशक फवारतो. या प्रयोगामागील उद्दिष्ट म्हणजे शेतीतील कामाचा वेळ व श्रम कमी करणे आणि अचूक फवारणीद्वारे कीड नियंत्रण अधिक परिणामकारक बनवणे. प्रात्यक्षिका वेळी प्रा. एन. बी. माने-देशमुख , प्रा. डी डी साळुंखे, प्रा. डी एम सावंत, डॉ. बी ए शिंदे, डॉ. डी एस थवरे, प्रा. एस आर आदट ,कु. गायत्री पाटील, चि. अभिषेक मोरे तसेच शेतकरी, विद्यार्थी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.