सिद्धी नवले हिचा सन्मान

सिद्धी नवले हिचा सन्मान
संचार वृत्त अपडेट
अकलूज : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या सिद्धी नवले हिस सत्कार करून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ, महामंडळ पुणे संलग्न सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य रंगभरण स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कूल माळीनगरची इयत्ता पहिली मध्ये शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी मंजित नवले हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला या यशाबद्दल प्रेस पत्रकार व पत्रकार सेवा संघाचे वतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी या चिमुकलीचा घरी जाऊन सन्मान केला.
सिद्धी नवले या लहान चिमुकलीचा शाळेतील प्रत्येक नृत्य, कला ,क्रीडा असे अनेक स्पर्धात्मक प्रकारामध्ये सहभाग असतो. प्रा डॉ. अरविंद नवले व प्रा.श्री अशोक नवले यांची ती नात असून एवढ्या लहान वयात तिने केलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.