solapur

माळशिरस तालुक्यात कोरोना रोगाचे पुन्हा आगमन नागरिकांनी सतर्क राहून स्वतःच्या आरोग्यची काळजी घ्यावी – डॉ.प्रियंका शिंदे

माळशिरस तालुक्यात कोरोना रोगाचे पुन्हा आगमन नागरिकांनी सतर्क राहून स्वतःच्या आरोग्यची काळजी घ्यावी – डॉ.प्रियंका शिंदे.

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (केदार लोहकरे)
नागरिकांनो कोरोना परत येत आहे.माळशिरस तालुक्यात नागरिकांनी गाफील राहू नका,आरोग्याची काळजी घ्या.असे आवाहन माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यासाठी माळशिरस तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
माळशिरस तालुक्यात दोन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने माळशिरस तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.माळीनगर ग्रामपंचायत हद्दीत या ठिकाणी ५४ वर्षाचा एक इसम व अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीत राऊतनगर या ठिकाणी एक महिला असून हे दोन्ही पेशंट सध्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.या दोन्ही रुग्णांचे नातेवाईक यांना क्वारंटाईन होण्यासाठी संबंधित विभागाने सूचना दिलेल्या आहेत.
सध्या तालुक्यात कोविड पसरत आहे व आपल्या तालुक्यातील जनतेचा मुंबई, पुणे,सातारा या शहरांशी कायम संपर्क असल्याने तसेच स्थलांतरित लोकांची ये जा कायम सुरू असल्यामुळे कोविड आपल्या तालुक्यात जास्त वाढू नये.त्या दृष्टिकोनातून आजपासूनच प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच आयएलआय व सारी,सर्दी,ताप,खोकला व श्वासनाला त्रास होत असल्यास ताबडतोब वैद्यकीय अधिकारी किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून संपर्कात राहण्याचे आवाहन माळशिरस पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका शिंदे यांनी आवाहन केले आहे.पाऊस भरपूर प्रमाणात चालू असल्याने व डास उत्पत्ती स्थानात वाढ झाली असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आजपासून पुढील पाच दिवस तालुक्यातील प्रत्येकाने घरातील कंटेनर सर्वे आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.तसेच डेंगू विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.तरी आपण कोरडा दिवस पाळून सहकार्य करावे.कीटक जन्य व जलजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी म्हणून पाणी उकळलेले पिण्यास वापरावे, मास्क सक्तिने वापरावा,हात स्वच्छ साबणाने धुवावे,आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी प्रत्येकाने रोज पहाटे प्राणायाम व योगासन करणे गरजेचे आहे.जेवणात आहार सकस घ्यावा.
डॉ.प्रियंका शिंदे
आरोग्य अधिकारी,
पंचायत समिती माळशिरस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button