पांडुरंग कारखान्याचे ऊस भूषण पुरस्कार जाहीर
पांडुरंग कारखान्याचे ऊस भूषण पुरस्कार जाहीर
श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)
सभासद शेतकऱ्यास “पांडुरंग ऊस भुषण” हा पुरस्कार देवुन सहपत्नीक गौरविन्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रक्कम रुपये 1,01,111/- रोख स्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र शाल व श्रीफळ देवुन सदर पुरस्कर्त्याला सहपत्नीक पुरस्कार प्रधान करण्यात येईल.
गळीत हंगाम 2023-24 चे “पांडुरंग ऊस भुषण” पुरस्कार विजेते शेतकरी
अ.नं. गळीत हंगाम – 2023-24
सभासदाचे नांव गांव गटाचे नांव
1 श्री प्रमोद किसन नाईकनवरे पट.कुरोली भोसे
त्याच बरोबर कारखान्याचे असणाऱ्या 7 गटामधून प्रत्येत गटामधून 1 पांडुरंग आदर्श शेतकरी हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराची एकुण संख्या 7 आहे. यामध्ये संपुर्ण गटामधून नाविन्यपुर्ण ऊस उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवुन अधिक साखर उताऱ्याच्या ऊसाचा पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यास पांडुरंग आदर्श शेतकरी या पुरस्काराने सहपत्नीक गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रक्कम रुपये 25,111/- रोख स्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र शाल व श्रीफळ व फेटा आहे.
गळीत हंगाम 2023-24 चे पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते शेतकरी
अ.नं. गळीत हंगाम -2023-24
सभासदाचे नांव गांव गटाचे नांव
1 श्री नारायण सुभाष रोंगे खर्डी पंढरपूर
2 श्री भिमराव ज्ञानेश्वर बागल वाखरी देगांव
3 श्री नागन्नाथ कुंडलिक जाधव सिध्देवाडी चळे
4 श्री चंद्रशेखर गणपत कोळवले भंडीशेगांव भाळवणी
5 श्री दत्तात्रय बळीराम माळी भोसे भोसे
6 श्री धनाजी जयवंत नरसाळे जळोली करकंब
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.श्री यशवंत कुलकर्णी हे 100 गुणांची तपासणी विविध मुद्यांचे आधारे करणेत येऊन हे पुरस्कार देण्यात आले आहेत. पुढे ते म्हणाले ऊस लागण करतेवेळी पुर्व मशागतीपासून माती परिक्षण,चांगल्या बेणेमळ्यातील बेणेचा वापर,हिरवळीची खते,शेणखताचे स्लरीचा वापर,ठिबक सिंचन,जिवाणु खतांचा वापर,विविध द्रवरुप खतांच्या फवारण्या या सर्व बाबींचे मुल्यमापन करणे करीता स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमनुक करणेत आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व शेतकऱ्यांचा याच्या तपशीलवार नोंदी वर्षभर ठेवण्यात आलेल्या होत्या.यामधुन अधिक साखर उताऱ्याचा ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
सदर पुरस्काराचे वितरण कारखान्याचे दि.26/09/2024 रोजी होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये स.11.00 वाजता वाखरी येथील प्रशासकीय भवन समोरील सभागृहात कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये वितरीत करणेत येणार आहेत.
ही नाविन्यपुर्ण स्पर्धा सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा.प्रशांत परिचारक मालक यांचे व कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास शंकरराव खुळे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धांचे मुल्यमापन करणेत आले. स्पर्धेतील शेतकऱ्यांना मा.कार्यकारी संचालक डॉ.श्री.यशवंत कुलकर्णी सो, केन मॅनेजर श्री.संतोष कुमठेकर सो व ऊस विकास अधिकारी श्री.सोमनाथ भालेकर सो, यांनी ऊस पीक घेत असताना विविध स्तरावरती मार्गदर्शन केले होते.
डॉ. यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक
———————————–
श्रध्देय सुधाकरपंत परिचारक(मोठे मालक) यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीनुसार कारखान्याचे कामकाज सुरु असून, मोठ्या मालकांचे हरितक्रांतीचे व शेतकरी सबलीकरणचे स्वप्न पुर्ण करणेस आम्ही कटीबध्द आहोत. सन 2023-24 चे ”ऊस भुषण पुरस्कार” जाहीर करताना मनस्वी आनंद होत असून, पुरस्कार प्राप्त सर्व सभासद बंधुंचे हार्दिक अभिनंदन व ऊस उत्पादन वाढीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा…
मा.आ.प्रशांत परिचारक
ऊस उत्पादन वाढविण्याच्या हव्यासापोटी जमिनीची प्रत खालावत आहे. जमिनीची सुपिकता वाढविणे ही काळाची गरज आहे. तरी ही गरज ओळखून कारखान्याचे सन्मानिय चेअरमन मा.आमदार प्रशांत परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली ऊस भुषण स्पर्धा आयोजित केलेल्या स्पर्धेतील सर्व सहभागी शेतकऱ्यांचे हार्दिक आभिनंदन.
ऊस भुषण पुरस्कारप्राप्त सर्व शेतकरी बांधवांना पुढील ऊस ऊत्पादन वाढीसाठी मन:पुर्वक खुप खुप शुभेच्छा …
डॉ.यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक
नाविन्यपुर्ण ऊस भुषण स्पर्धा
ऊत्पादन खर्च व साखर उतारा, मिळालेले उत्पन्न यावर आधारीत सर्पर्धा
पुरस्कारामध्ये सहभागी स्पर्धकांचे करिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वर्षभरामध्ये ऊस पिकाचे 100 गुणांचे मुल्यमापन करुन पुरस्कार दिले जातात.
पिक कालावधीमध्ये जमिनीच्या सुपिकतेला महत्व व त्यावरुन मुल्यांकन केले जाते.
व्हीएसआय पुणे यांचे प्रशिक्षण अनिवार्य