कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवरील प्रथम पुरस्काराने सन्मान
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा देश पातळीवरील प्रथम पुरस्काराने सन्मान
बी.टी.शिवशरण(ज्येष्ठ पत्रकार)
श्रीपुर (प्रतिनिधी)कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्ली यांचा तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला होता सदर पुरस्काराचे वितरण आज रोजी नवी दिल्ली येथे देशाचे सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल व चौधरी लक्ष्मीनारायण सिंह – सहकार मंत्री उत्तर प्रदेश, आणि नॅशनल फेडरेशन कॉपरेटिव शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार कारखान्याचे व्हा चेअरमन कैलास खुळे ,सर्व संचालक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी यांनी स्वीकारला कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच देशात अग्रेसर राहिला असून गत हंगाम 2023- 24 मध्ये गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर, स्टीमची बचत, कारखाना बंदचे अत्यल्प प्रमाण ,बगॅसची बचत, जास्तीची वीज निर्मिती ,जास्तीचा साखर उतारा याशिवाय अन्य तांत्रिक बाबीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे कारखान्यास देश पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला असून यामध्ये कारखान्याचे व्हा चेअरमन, सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व कारखान्याचे अधिकारी त्याचबरोबर ऊस पिकवणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे श्रेय असल्याची भावना कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त करून या सर्वांचे अभिनंदन केले.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास या अगोदर व्यवस्थापनाने उत्कृष्ट काम केल्यामुळे राज्य पातळीवरील व देशपातळीवरील 55 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा आज मिळालेला देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेच्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे
प्रशांत परिचारक (चेअरमन)
—————————————————— कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा देशात सर्वच पातळीवर नेहमीच अग्रेसर राहिलेला असून यापुढेही कारखान्याची प्रगती उल्लेखनीय राहील .शेतकरी हिताय , कामगार सुखाय या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांची सर्व देनी ,कामगारांचे पगार ,बोनस व इतर देनी वेळीच अदा केलेली आहेत गत हंगामामध्ये कारखान्याची गाळप क्षमता 10000 प्रतिदिन मे टन केली असून त्याप्रमाणे गाळप होत आहे या हंगामासाठी कारखान्याकडे सुमारे अकरा हजार हेक्टर क्षेत्राच्या नोंदी असून त्यामधून बारा ते साडेबारा लाख मॅट्रिक टन उपलब्ध होईल असा अंदाज आहे
कारखान्याने दिलेला ऊस दर व उत्तम व्यवस्थापन यामुळे कारखान्यास ऊस देणाऱ्या शेतकऱ्याचा कल जास्तीचा असून टनेजमध्ये वाढ होईल कारखान्यास उसाचा सुरळीत व विनाखंड पुरवठा व्हावा यासाठी कारखान्याने पाच ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली असून ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांचे करारही केलेले आहेत अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड नवी दिल्ली यांचे कडून मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलासराव खुळे , दिनकरभाऊ मोरे, दाजी पाटील, तानाजी वाघमोडे बाळासाहेब यलमार, भगवानराव चौगुले , भास्कर कसगावडे , लक्ष्मण धनवडे , गंगामामा विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थित होते.