अकलूज येथे रामनवमीनिमित्त दिव्यांग मतिमंद मुलांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न.

अकलूज येथे रामनवमीनिमित्त दिव्यांग मतिमंद मुलांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे)
संग्रामनगर अकलूज येथील श्री साईबाबा ट्रस्ट व शाश्वती मेडिकल रिसर्च फाउंडेशन शिंदे होमिओपॅथिक हॉस्पिटल यांनी रामनवमीनिमित्त दिव्यांग मतिमंद मुलांसाठी मोफत तपासणी व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन अकलूज येथील डायबिटीस स्पेशालिस्ट डॉ.निखिल राजेंद्र आर्वे व डॉ.सौ.बिना निखिल आर्वे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने पाटील यांनी साईबाबा ट्रस्टच्या कार्याची माहिती देऊन आजपर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून समाज उपयोगी विविध उपक्रम आयोजन करण्यात आले आहे व समाज प्रबोधनाचे कार्य केले असल्याचे सांगितले यावर्षी दिव्यांग अभंग मतिमंद मुलांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दिली शिबिरामध्ये जी मुले चालत नाहीत बोलत नाही यांचा वैयक्तिक अभ्यास करून एक महिन्याची मोफत सेवाभावी औषध देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. निखिल आर्वे म्हणाले की, डॉ. रवींद्र शिंदे एमडी होमिओपॅथी आणि योगिता शिंदे मुक्तांगण थेरपी सेंटरच्या माध्यमातून दोघांनी मिळून कित्येक दिव्यांग मुलांची जीवनशैली सुधारणासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे.त्यांच्या कार्यास सर्व सहकार्य करू असे सांगितले. यावेळी बोलताना डॉ.रवींद्र शिंदे म्हणाले मतिमंद अपंग घरात जन्माला आल्यावर त्या कुटुंबाच्या अवस्था वेगळी असते.कुटुंबाचा सर्व अभ्यास करूनच आम्ही आई-वडिलांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत असतो.गेले दहा वर्षापासून मी या क्षेत्रात कार्यरत असून सर्वांच्या सहकार्याने मला बऱ्यापैकी यश आले आहे. या शिबिरात 15 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत कुंभार यांनी मानले यावेळी ट्रस्टचे सचिव राजेंद्र आर्वे,देवचंद ओसवाल, सुभाष काळे,विजय टोंगळे,उमेश शेटे,अरुण राऊत,दिपक शिंदे उपस्थितीत होते.