रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले पत्ते ठेवले झाकून चर्चेला उधाण
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले पत्ते ठेवले झाकून चर्चेला उधाण
बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार–श्रीपूर
विधानसभा निवडणूक वातावरण ढवळून निघाले आहे माळशिरस तालुक्यात महाविकास आघाडी चे उमेदवार उत्तम जानकर व महायुतीचे उमेदवार राम सातपुते या दोन गत पंचवार्षिक मध्ये तुल्यबळ लढत झाली होती त्या वेळी राम सातपुते हे काठावर पास होऊन निवडून आले होते विशेष म्हणजे त्यावेळी संपूर्ण मोहिते पाटील परिवार व मोहिते पाटील समर्थक व भाजप बरोबर होते तरी ते निसटत्या मताने निवडून आले होते यावेळी मोहिते पाटील हे महाविकास आघाडी बरोबर आहेत त्यांचा पाठिंबा उत्तम जानकर यांना आहे यावेळी फक्त एकटे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे महायुतीकडे त्यांच्या परिवारातील एकमेव सदस्य आहेत मात्र त्यांनी महायुती बरोबर रहाणार किंवा राम सातपुते यांचा प्रचार करुन निवडून आणणार या बाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही राम सातपुते यांच्या उमेदवारिचा फार्म भरतांना सुध्दा ते उपस्थित राहिले नाहीत तसेच मधल्या काळात ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून तुतारी हातात घेऊन माढा विधानसभा निवडणूक लढणार अशी जोरदार चर्चा सुरू होती त्यावर ही त्यांनी त्या बाबत आपले तोंड उघडले नाही गेल्या महिन्यात अकलूज येथे कांग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्या वेळी महाविकास आघाडी चे खासदार यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाला महाविकास आघाडी चे दिग्गज नेते उपस्थित होते त्या कार्यक्रमाला मात्र ते उपस्थित राहिले पण व्यासपीठावर बसले नाहीत पण त्या कार्यक्रमात त्यांनी उस्फुर्त भाषण केले त्यावेळी अनेकांना वाटलं होते ते कदाचित महाविकास आघाडी मध्ये प्रवेश करतील पर्यायी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी मध्ये जातील पण त्यावेळी त्यांनी सावध भूमिका घेऊन तालुक्यातील जनतेत या बाबत उत्सुकता वाढवली आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागली आहे या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात तालुक्यांत अशी जोरदार चर्चेला उधाण आले होते की आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजप सोडणार कांग्रेस पक्षात प्रवेश करणार व माढा विधानसभा निवडणूक लढणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली तरी त्यावर रणजितसिंह यांनी चकार शब्द काढला नाही हा सस्पेन्स कायम ठेवला असला तरी त्यांनी मी भाजपमध्येच आहे भाजप सोडण्याचं कारणच काय मी निस्सीम देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे असेही ते सांगायला पुढे येत नाहीत त्यामुळे त्यांच्या मनात द्विधा अवस्था झाली आहे एकीकडे भाजपचे सरकारने त्यांना सदाशिवनगर येथील त्यांच्या साखर कारखान्याला मदत केली आहे राज्य सरकारने हमी घेतली आहे कदाचित या जाणीवेतून ते भाजप सोडायला तयार नसावेत या एकंदरीत सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीत ते स्पष्ट बोलत का नाहीत तसेच मग ते मी भाजप मध्येच रहाणार आहे मी माळशिरस तालुक्यातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी बांधील आहे त्यांचा उघड प्रचार करणार आहे असे ते का धाडसाने पुढे येऊन बोलू शकत नाहीत ते राम सातपुते यांनी निवडणूक फार्म भरतांना का उपस्थित नव्हते याचे स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे अंदर की बात काही दिवस लपून ठेवता येते पण ती केव्हाही पटकन बाहेर येऊ शकते हा राजकीय सामाजिक सिध्दांत आहे ते चांगले भाषण करू शकतात पण त्यातील जोश आक्रमकता नाविन्य रहात नसल्याने त्यांच्या बाबतीत कुठेतरी विश्वासार्हतेला ठेच लागणार नाही हे त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे एवढं मात्र नक्की आहे सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे कडे पुन्हा नव्याने नेतृत्वाची संधी चालून येऊ पहात असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र आपले पत्ते झाकून ठेवावेत हे काही पटण्यासारखे नाही अशी चर्चा आहे