गुरु पौर्णिमा निमित्त श्री बृहन्मठ वेळापूर येथे सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांचे भव्य संगीतमय इष्टलिंग महापूजा सर्व शिष्य भक्तांच्या समवेमध्ये संपन्न

गुरु पौर्णिमा निमित्त श्री बृहन्मठ वेळापूर येथे सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांचे भव्य संगीतमय इष्टलिंग महापूजा सर्व शिष्य भक्तांच्या समवेत संपन्न.
संचार वृत्त अपडेट
आज सकाळी पहाटे श्री गुरु गादीस रुद्राभिषेक व मंगलमय आरती होऊन. सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे मार्गदर्शनाखाली संगीतमय ईस्टलिंग पूजा सुरू झाली ही पूजा पाहण्यासाठी पुणे, अकलूज ,टेंभुर्णी ,मानेगाव, महुद ,वैराग , अकलूज व परिसरातील महिला भजनी मंडळ आदी भागातून भक्तजनांनी मोठी गर्दी केली होती पूजेनंतर सदगुरू सदाशिव शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाचन प्रवचन होऊन समाजातील दहावी बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमासाठी दौंड येथील विजय मस्के सर यांनी अन्नदान केले सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व पूजेचे पौर्वात्य शिवशंकर स्वामी. नागेश खरगे स्वामी, झाडबुके सर, विठ्ठल बागल ,यांच्यासह स्थानिक समाजाने सहभाग घेतला होता पुढील वर्षी शिवाचार्य सद्गुरु मुक्तेश्वर स्वामी महाराज यांची अमृत महोत्सवी वाढदिवस व गुरु गादीस पन्नास वर्षे पूर्ण होत असले निमित्त मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्याचे यावेळी ठरले व तसा संकल्प सोडण्यात आला महाप्रसादाचे आयोजन करणारे विजय मस्के व सौ मस्के यांच्या हस्ते श्री गुरूंची आरती करण्यात आली नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.