शिवगर्जना ग्रुप मार्फत चालवले जाणारे विविध उपक्रम अतिशय स्तुत्य : शिवतेजसिंह मोहिते पाटील

शिवगर्जना ग्रुप मार्फत चालवले जाणारे विविध उपक्रम अतिशय स्तुत्य : शिवतेजसिंह मोहिते पाटील
संचार वृत्त अपडेट
देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे..!! या उक्तीप्रमाणे आज दिनांक ४जुलै २०२५रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट बिजवडी येथे शिवगर्जना ग्रुप अकलूज यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना रुपये १०००० किमतीचे स्पोर्ट्स गणवेश वाटप अकलूज गावचे माजी सरपंच माननीय शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवगर्जना ग्रुप मार्फत चालवला जाणारा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची भावना माननीय शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. शिवगर्जना ग्रुप मार्फत दरवर्षी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकरी भक्तांना अन्नदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. रावबहाद्दूर गट शाळेतील मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स गणवेशाची मागणी केल्याबरोबर त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले. त्याबद्दल शिवगर्जना ग्रुप यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी महेश खडके, गणेश खडके , अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर ननवरे, नर्सिंग कॉलेज अकलूज चे चेअरमन पराग गायकवाड, विशाल (आबा )गोरे, महेंद्र आडगळे, राहुल (बंटी) जगताप, मुख्याध्यापक श्रीकांत राऊत उपशिक्षक अजमेर फकीर उपस्थित होते. यासाठी बिजवडी गावचे सरपंच पूजाताई शिंदे, उपसरपंच वर्षाताई मदने, बिजवडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशा भजनावळे उपाध्यक्ष दिपाली लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.