तुकाराम महाराज पालखीतील भक्तांना शिवबाबा मित्र परिवाराच्या वतीने इडलीचे वाटप

तुकाराम महाराज पालखीतील भक्तांना शिवबाबा मित्र परिवाराच्या वतीने इडलीचे वाटप
संचार वृत्त अपडेट
देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी अकलूज येथे आली असता पालखी समवेत आषाढी वारीसाठी पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना गांधी चौक येथे शिवबाबा मित्र परिवाराच्या वतीने अन्नदान म्हणून गांधी चौक येथे इडलीचे वाटप करण्यात आले गेली दहा वर्षे हा उपक्रम चालू आहे. याप्रसंगी अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराज देशमुख, रोहित घोरपडे, विक्रम भिलारे, प्रसाद फडे, मोहम्मद मिसरी, अजिंक्य फडे, मयूर माने, नीरज राऊत, साहिल सय्यद, दिग्विजय सुळ, शशांक गायकवाड, बबलूशेठ मुलानी, अस्लम पठाण, अजिंक्य सावंत, सनी शेख, नितेश अंधारे, प्रणित निंबाळकर, साहिल दोशी, खुझेम पटवाला, सौरभ माने सर्व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले