solapur

आमदार उत्तम जानकर यांच्या घरावर मोर्चाचे नियोजन

आमदार उत्तम जानकर यांच्या घरावर मोर्चाचे नियोजन

संचार वृत्त अपडेट 

आमदार जानकर यांच्या घरावर मविसेचा १७ जून रोजी मोर्चा

तालुक्यातील अवैद्य दारू धंदे बंद करण्याची मागणी

 उपविभागीय पोलीस अधिकारी माळशिरस विभाग अकलूज व माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांना निवेदन देवून माळशिरस तालुक्यातील वेळापूर,माळशिरस,नातेपुते, अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेले बेकायदेशीर दारू,शिंदी,ताडी चे धंदे कायमचे बंद करून निर्मिती करणारे व मूळ मालकावर तडीपरीची कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव व संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी केली आहे.माळशिरस तालुक्यातील माळशिरस,नातेपुते,वेळापूर,अकलूज पोलीस स्टेशनच्या व राज्य उत्पादन शुल्क विभाग अकलूज यांच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू,शिंदी,ताडी विक्री,निर्मिती करणाऱ्यांवर तडीपरीची कारवाई करून हे धंदे कायमचे बंद करण्यात यावेत यासाठी ९ जून रोजी अकलूजमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला मात्र आत्तापर्यंत चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर दारू,शिंदी,ताडी विक्री सुरूच आहे.या विरोधात अकलूजमध्ये गेली पाच दिवस झाले आंदोलन सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग या बेकायदेशीर धंद्याकडे दुर्लक्ष करीत आहे.असल्याचा आरोप करण्यात आला आहे.पदयात्रा व मोर्चा पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती देण्यात आली.माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी नुकतीच माळशिरस येथे आमसभा घेतली होती,आणि तालुक्यात बेकायदेशीर दारू धंदे चालू देणार नाही असे म्हटले होते मात्र धंदे खुलेआम सुरू असून त्याची आठवण करून देण्यासाठी आणि तालुक्यातील चार पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभाग अकलूज कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या दारूचे धंदे बंद करण्यात यावेत यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी आणि दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या घराकडे दिनांक १७ जून रोजी अकलूज मधून सकाळी ९ वाजता पदयात्रा/मोर्चा निघणार असून त्यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि जर हे धंदे बंद करण्यात आले नाहीत तर त्याच दिवसापासून त्यांच्या घरासमोर असलेल्या पालखी मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button