अकलूज नगर परिषदेकडे कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी त्वरित जमा करण्याची मागणी

अकलूज नगर परिषदेकडे कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी त्वरित जमा करण्याची मागणी
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगर परिषद येथील कॉन्टॅक्ट बेसेज वरती झाडलोट,सफाई महिला कर्मचारी यांचा थकीत पगार लवकरात लवकर जमा करावा असे निवेदन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी जयसिंग खुळे यांना दिले.
सदरील विषय संघटनेचे वरिष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे , उपाध्यक्ष तेजस परमार यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले आहे.
सध्या गौरी गणपती सन असून सण साजरा करण्यात कर्मचाऱ्यांना आर्थिक टंचाई भासत असून परिस्थिती नाजूक झाली आहे तरी त्वरित कर्मचाऱ्यांचा पगार जमा करावा असे निवेदनात म्हटले आहे पगार जमा न झाल्यास नगर परिषदेच्या कार्यालयाच्या पायरी वरती भीक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
थकीत पगार दोन दिवसात देण्याचे आश्वासन उपमुख्य अधिकारी अकलूज नगर परिषदेचे जयसिंग खुळे यांनी दिले आहे.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी मोरे, उपाध्यक्ष अश्विनी पांढरे,संग्राम नगर शहर विभाग अध्यक्ष रोहित टेके व इतर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.