
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीची सरकारने घेतली दखल
सामाजिक न्याय मंत्रालयाने शासन निर्णय केला पारित
संचार वृत्त अपडेट
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिनांक २० ऑगस्ट रोजी मंत्रालयात जाऊन पक्षप्रमुख किरण साठे यांनी त्यांच्या कार्यालयात निवेदन दिले होते.निवेदनात महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या जामीनदाराच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा केल्याची घोषणा १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती, त्याचा शासन निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर तात्काळ पारित करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.त्याची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांना निवेदन पाठवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर हर्षदीप कांबळे यांनी दिनांक २१ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय विभागाच्या उप सचिव वर्षा देशमुख,अवर सचिव सतीश खैरमोडे,कक्ष अधिकारी नागेश बामणे यांना शासन निर्णय काढण्यासाठी आदेश दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी २२ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी संपर्क साधला त्यांनी उपसचिव वर्षा देशमुख यांच्याशी बोलायला सांगितले.उपसचिव वर्षा देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना शासन निर्णय पारित करण्याच्या मागणीवर कार्यवाही केल्याची माहिती देण्यात यावी असा इमेल किरण साठे यांनी २२ ऑगस्ट रोजी दुपारी २.५४ मिनिटांनी केला होता.त्यानुसार त्यांनी २२/८/२५ रोजीच उपसचिव वर्षा देशमुख यांनी शासन निर्णय पारित केला आणि महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड केला.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला प्रचंड यश मिळाले असल्याचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी सांगितले.