जादूटोणा केल्याच्या कारणावरून संन्याशी महाराजास मारहाण

जादूटोणा केल्याच्या कारणावरून महाराजाला मारहाण
संचार वृत्त अपडेट
जादूटोणा करून आमच्या जीवनाचे वाटोळे केले. असे म्हणत एका २६ वर्षीय संन्याशी महाराजास क्रिकेटच्या स्टंपने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना माळेवाडी कॉलेज रोड येथे २५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
भागवत दगडू कोल्हे (वय २६ रा. दत्त आश्रम वडवाडी ता. पैठण जि. संभाजीनगर) असे जखमी महाराजाचे नाव आहे. त्यांनी अकलूज पोलिसात नुकतीच फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी चेतन उर्फ सोन्या सोनटक्के, आनंद थोरात आणि अजित इंगळे (सर्व रा. अकलूज) या तियाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे भागवत कोल्हे हे महाराज २५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास माळेवाडी कॉलेज रोडवरील त्यांचा मित्र गोरे यांच्या साई स्पोर्ट्स दुकानात बसले होते. त्यावेळी चेतन उर्फ सोन्या सोनटक्के यांच्यासह तिघांनी दुकानात येऊन त्यांना तू माझ्या जीवनाचे वाटोळ करून आमच्यावर जादूटोणा केला. आमची पैलवानकी संपवली असे म्हणत दुकानातील लाकडी स्टंप घेऊन त्यांना मारहाण करीत दुकानाच्या बाहेर काढले. आणि पुन्हा स्टॅम्पने बेदम मारहाण केली त्यात त्यांचे मनगटाचे हाड फॅक्चर झाले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार कुंभार पुढील तपास करीत आहेत.