मानवी जीवनाला अर्थ देणारी व्यक्ती, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा -महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर – सतीश कचरे

मानवी जीवनाला अर्थ देणारी व्यक्ती, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा -महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर – सतीश कचरे
संचार वृत्त अपडेट
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘ शिखा संघटीत व्हा संघर्ष करा ! पंचशीलाचे प्रचारक , बॅरीस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीस१३२ कोटी प्रणाम !! त्याचे काम कार्य बाबत सर्वाना ज्ञात व्हावे यासाठी केलाला हा छोटास प्रयत्न सर्वाना अर्पन !!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतातील या व्यक्तीमत्वाची ओळख विश्वरत्न म्हणून आहे. त्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य सूर्य उगवला. सूर्यप्रकाशात जीवन उजळले.
भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत संघर्ष करावा लागला, तो सुद्धा बुरसट विचांरानी ग्रस्त अशा जगण्यासाठी मानवी हक्कही नाकारणाऱ्या अन्यायी स्वकियांशीच. पण त्यांनी ही लढाई अचाट बुद्धिमत्ता.. कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर, शांततेच्या मार्गाने जिंकली. समाजात सौदार्ह राखून लोकांचे मन आणि मत परिवर्तन घडविले.
उच्चविद्याविभूषित असे बॅरिस्टर बाबासाहेब हे भारतातील पहिले अर्थतज्ञ. जीवनात संघर्ष करुन त्याकाळात देशविदेशातून अनेक विषयाच्या मिळवलेल्या पदव्या थक्क करणाऱ्या आहेत. त्यांना मोठमोठे मानसन्मानही प्राप्त झाले. एकाच वेळी त्यांना अनेक विषयांचे सखोल ज्ञान होते. समाजाविषयी असलेल्या आपुलकीमुळे शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी कायदे करताना या ज्ञानाचा उपयोग केला.
नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब. जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले. वडिलांच्या संस्काराने बालपणीच त्यांना वाचनाची आवड लागली. कबीर.. महात्मा फुले आणि भगवान बुद्ध हे बाबासाहेबांचे आदर्श. या ज्ञान तपस्वींनी विकासासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे समाजात बिंबविले.
बाबासाहेब हे सर्वच क्षेत्रासाठी दीपस्तंभ. भारतातील पहिले अर्थतज्ञ. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी.. त्यांनी कामगारांचे.. शेतकऱ्यांचेही नेतृत्व केले. न्याय दिला. महिलांना हक्क मिळवून दिले. शेती सुधारणा.. शाश्वत पाणी पुरवठा यावरची मते आजही मार्गदर्शकच.
शिक्षण जे प्रज्ञा.. शील.. करुणा हे गुण अंगी बाणवायला शिकवते. चांगले वाईट याची जाण होते. शिक्षणाने मुलांची मने सुसंस्कृत.. गुणवत्तामय व्हावीत. सामाजिक बांधिलकीची कर्तव्य समर्थपणे पार पडता यावी असे शिक्षण हवे असे म्हणायचे. ज्ञानतपस्वी बाबासाहेब रोज बारा तास विविध विषयावर वाचन करायचे. मनुष्य जन्मभर विद्यार्थीच आहे असे ते म्हणत. त्यांच्या स्वतःच्या वाचनालयात पन्नास हजार पुस्तके होती. स्मारके ही ग्रंथालये व्हावीत असे म्हणत.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संरक्षणाची कवचकुंडले प्राप्त करुन देणारी राज्यघटना डॉ. बाबासाहेबांनी दिली. कायद्याने सर्वांना समसमान अधिकार प्राप्त झाले. या घटनेने प्रत्येकाला न्याय दिलाय हे बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे, म्हणूनच ह्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब महामानव ठरले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..
कवी सुरेश भट यांची कविता गीत
भीमराया घे तुझ्या या_
लेकरांची वंदना_
आज घे ओथंबलेल्या_
अंतरांची वंदना_
दुमदुमे ‘जयभीम’ ची,_
गर्जना चोहीकडे_
सारखा जावे तिथे,_
हा तुझा डंका झडे_
घे, आता घे राहिलेल्या_
संगरांची वंदना_
कोणते आकाश हे,_
तू अम्हा नेले कुठे,_
तू दिलेले पंख हे,_
पिंजरे गेले कुठे_
या भराऱ्या आमुच्या,_
ही पाखरांची वंदना_
कालचे सारे मुके,_
आज बोलू लागले_
अन तुझ्या सत्यासवे,_
शब्द तोलू लागले_
घे वसंता, घे मनांच्या_
मोहरांची वंदना_
जाळले गेलो तरी,_
सोडले नाही तुला_
कापले गेलो तरी,_
तोडले नाही तुला_
ही तुला उध्वस्त झालेल्या_
घरांची वंदना_
तू उभा सूर्यापरी,_
राहिली कोठे निशा_
एवढे आम्हा कळे,_
ही तुझी आहे दिशा_
मायबापा घे उद्याच्या_
अंकुरांची वंदना_
धम्मचक्राची तुझ्या,_
वाढवू आम्ही गती_
हा तुझा झेंडा आम्ही,_
घेतलेला सोबती_
ऐक येणाऱ्या युगांच्या_
आदरांची वंदना_
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं…?
१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा
२. कामगार राज्य विमा (ESI)
३. कामाचे १२ तासावरून ८ तास
४. कामगार संघटनेची मान्यता
५. भर पगारी सुट्या
६. महागाई भत्ता
७. कायदेशीर संपाचा अधिकार
८. आरोग्य विमा
९. कामगार कल्याण निधी ( labour welfare fund)
१०. निर्वाह निधी (Provident Fund)
११. पालकत्वाचा अधिकार
१२. घटस्फोटाचा अधिकार
१३. प्रसूती पगारी रजा
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
१५. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
१६. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार
१७. महिला कामगार सरंक्षण कायदा (Women Labour Protection Act)
१८. मतदानाचा अधिकार
१९. भारतीय सांख्यिकीक कायदा (Indian Statistical Law)
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (Technical Training Scheme)
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (Central Technical Power Board)
२२. विद्युत जोड प्रकल्प (Power Grid System)
२३. राज्य विभागणी आयोग (State Division Commission)
२४. मध्यवर्ती जलसिंचन आयोग
२५. अर्थव्यवस्थेची तरतूद (Provision Of Finance Commission)
२६. नदी जोड प्रकल्प
२७. दामोदर खोरे प्रकल्प
२८. हिराकुंड धरण
२९. भाक्रा-नांगल धरण
३०. सोनेक नदी प्रकल्प
३१. भारतीय रिझर्व्ह बँक
३२. रोजगार विनिमय (Employment Exchange)
आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे “संविधान”….लव्ह यु बाबासाहेब.