होमिओपॅथीचे जनक डॉ. समूयल हानेमान यांची २७० वी जयंती साजरी

होमिओपॅथीचे जनक डॉ. समूयल हानेमान यांची २७० वी जयंती साजरी
संचार वृत्त अपडेट
प्रतिनिधी (केदार लोहकरे)
माळशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन आणि माळशिरस तालुका महिला डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होमिओपॅथी चे जनक डॉ.समूयल हानेमान यांच्या २७० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.पृथ्वीराज माने-पाटील, डॉ.रवींद्र पाटील,डॉ.अभिजीत राजेभोसले,डॉ.वैष्णवी शेटे,डॉ. सपना गांधी आणि तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टर्स उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रतिमा पूजन आणी दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.निखिल जामदार यांनी केले. डॉ.समयुअल हनेमान हे प्रामुख्याने एमडी डॉक्टर होते. परंतु त्यांनी सिकोना ऑफिसिनालीस ही वनस्पती घेतले असता त्यांना मलेरिया या आजाराची लक्षणे जाणवली यातूनच त्यांनी होमोिओपॅथी या शास्त्राचा शोध लावला आणि अशी जवळजवळ सहा हजार पेक्षा जास्त होमिओपॅथिक औषधे तयार केली आहेत. होमिओपॅथी उपचार पद्धती ही आजारावर ट्रीटमेंट न करता संपूर्ण पेशंट,त्याची मानसिक स्थिती आणी पूर्ण हिस्टरी यावर अवलंबून आहे.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन होमिओपॅथी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ.अभिजीत राजेभोसले यांनी केले.