solapur

महर्षि प्रशालेत स्पर्श संवेदना जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न

महर्षि प्रशालेत स्पर्श संवेदना जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न

संचार वृत्त अपडेट 

महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे 18 जुलै रोजी किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या वयानुसार होणाऱ्या बदलांची जाणीव व्हावी या हेतूने स्पर्श संवेदना जाणीव जागृती कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले .
कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्यात्या डॉक्टर तेजस्विता संभाजी राऊत त्वचारोग तज्ञ संग्राम नगर उपस्थित होत्या.इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना चांगल्या व वाईट स्पर्शांची जाणीव होऊन त्यांना वाईट स्पर्शास विरोध करता यावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


डॉक्टर तेजस्विता राऊत यांनी विद्यार्थिनींना मुलींच्या आरोग्य विषयक तक्रारी, वाढीव वयात घ्यावयाचा सकस आहार, वाईट स्पर्शाला तात्काळ विरोध, निर्भया पथकाची माहिती ,सोशल मीडियाचा दुरुपयोग ,परलिंगी आकर्षण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
स्पर्श संवेदनांच्या आत्मीय व निरागस आनंदाऐवजी वाढत्या पिढीच्या मनात निर्माण होणारा संभ्रम व धास्ती दूर करण्याचा हेतू कार्यक्रमातून सफल झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाग्यश्री उरवणे,स्नेहलता एकतपुरे,नाझिया मुल्ला यांनी कामकाज पाहिले.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन नाझिया मुल्ला यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button