अकलूज (माळेवाडी) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू

अकलूज (माळेवाडी) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू
स्तुत्यपर उपक्रम वयोवृद्धासाठी आनंदात व ज्ञानात भर : देवन्या मोहिते पाटील
संचार वृत्त अपडेट
माळेवाडी अकलूज येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू.
संग्रामनगर -(केदार लोहकरे यांजकडून)
माळेवाडी-अकलूज येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने अकलूज ग्रामपंचायत लोकप्रिय माजी सरपंच तथा युवकांचे ह्रदयसम्राट शिवतेजसिंह (शिवबाबा) मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन सौ.देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ.देवन्या मोहिते-पाटील म्हणाल्या की,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने मोफत जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केलेला उपक्रम हा स्तुत्यपर असून वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे.या वाचनालयमुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडणार आहे.
यावेळी अंधश्रद्धा निर्मुलनचे व्याख्याते व वनस्पती शास्त्र विभागाचे माजी प्रा.रामलिंग सावळजकर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे,जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने,ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे,पत्रकार लक्ष्मीकांत कुरूडकर,पत्रकार संजय लोहकरे,सुनील कांबळे, विशाल साठे,सचिन झेंडे,अनुराग खंडागळे,पृथ्वीराज कारंडे,प्रकाश भोसले,लालुभाई शेख,बल्लू देशमुख,विजय सुर्यवंशी, रघुनाथ देशमुख,अण्णासाहेब जगदाळे, दादा थीटे,अशोक कोळी,सुनिल कांबळे,विशाल साठे,पृथ्वीराज कारंडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत कडबाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ खंडागळे यांनी मानले.