अकलूज मध्ये पडत्या पावसात वंदे मातरम , भारत माता की जय चा नारा भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ रॅली

अकलूज मध्ये पडत्या पावसात वंदे मातरम , भारत माता की जय चा नारा भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ रॅली
संचार वृत्त अपडेट
अकलूज
पडत्या पावसात वंदे मातरम्,भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडत येथील परिसरातील देशप्रेमी युवकांनी भारतीय सेनेच्या समर्थनार्थ व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा काढली.माजी आ.राम सातपुते यांनी त्याचे नेतृत्व केले.
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी निरपराध २६ पर्यटकांचा बळी घेतल्याचा बदला घेताना भारतीय सेनेने सिन्दुर ऑपरेशन च्या माध्यमातून तब्बल ९ अतिरेकी तळ उद्धवस्त करीत १०० हून अधिक अतिरेक्यांना यमसदनी धाडले.अशा पराक्रमी भारतीय सेनेचे कौतुक करुन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात आली होती.
शहरात पावसाची रीप रीप सुरु असताना सायंकाळी पडत्या पावसात येथील सदुभाऊ चौकातुन या यात्रेला सुरुवात झाली,ती पुढे महावीर पथ,गांधी चौक,जुने पोलिस ठाणे,जुने बस स्टँड मार्गे आझाद चौकापर्यत काढली.त्या ठिकाणी यात्रेची सांगता झाली .याठिकाणी यात्रेतील देशप्रेमीं युवकांनी भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान जय किसान,निम का पेंड कडवा है पाकिस्तान भडवा है अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.यावेळी माजी आ.राम सातपुते, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,सुजितसिंह माने पाटील,हंसाजीराव माने पाटील,आप्पासाहेब देशमुख,बाजीराव काटकर,विक्रमसिंह माने देशमुख,अमित टिळेकर आदी उपस्थितानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बोलताना माजी आ.राम सातपुते म्हणाले, पाकिस्तानाने अतिरेक्यांच्या मदतीने कुरघोड्या करून पहलगाम येथे निरपराध २६ भारतीयांचे बळी घेतले.त्याचा बदला भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून चोख उत्तर दिले. अतिरेक्यांचे तळ उदध्वस्त करुन कडव्या अतिरेक्यांना ठार केले.हे भारतीयांसाठी अभिमानस्पद असल्याचे ते म्हणाले.