अकलूज येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समितीच्या वतीने सत्संग सोहळा व वधू वर मेळाव्याचे आयोजन
अकलूज येथे श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती समारंभ समितीच्या वतीने सत्संग सोहळा व वधू-वर मेळाव्याचे आयोजन.
अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज येथे श्री संत रविदास महाराज समाज विकास संस्था पुणे व श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती समारंभ समिती अकलूज यांच्या वतीने चर्मकार समाजातील इच्छुकांचा वधू-वर परिचय मेळावा व संत श्री १०८ गुरूदिपगिरीजी महाराज यांचा सत्संग सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.८ डिसेंबर रोजी दुपारी २:०० ते रात्री ८:०० या वेळेत श्री लक्ष्मी बालाजी हाॅल बायपास रोड सुजित गार्डन शेजारी होणार तरी समाज बांधवांनी सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.दिलीप गुजर यांनी केले आहे.
श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती समारंभ समिती अकलूज यांच्या वतीने श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या अमृतवाणीवर संत श्री १०८ गुरूदिपगिरीजी महाराज, चेअरमन बेगमपुरा युनिव्हर्सिटी पठाणकोट (पंजाब) यांचा सत्संग सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर चर्मकार समाजातील इच्छुकांचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये प्रथम वधू-वर डॉक्टर,इंजिनिअर, व्यावसायीक,शासकीय व अशासकीय नोकर,शेतकरी तसेच घटस्फोटित,विधवा,विधूर, अपंग यांच्यासाठी ठेवण्यात आला आहे तरी इच्छुक वधू-वर यांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सायंकाळी ५:०० ते ६:०० नामजप व ध्यान धारणा,६:०० ते ६:३० स्वागत समारंभ,६:३० ते ७:३० सत्संग सोहळा,७:३० ते ८:०० महाआरती व दर्शन रात्री ८:०० ते ९:०० कार्यक्रम आयोजित केले आहेत असे
आयोजक सुखदेव नारायण सुर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष), आबासाहेब रामचंद्र शिंदे (अध्यक्ष),अशोक हरी शिंदे (खजिनदार) यांनी सांगितले आहे.तरी या कार्यक्रम संदर्भात समाजाने डॉ.दिलीप गुजर (7020837720),श्री.शंकर बागडे (9822225888), श्री.राजेंद्र सोनावणे (9921556700)
श्री.राजाराम गुजर (9890523288) यांच्याशी संपर्क साधावा.