विझोरी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखेचे उदघाटण उत्साहात संपन्न

विझोरी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखेचे उदघाटण उत्साहात संपन्न
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील विझोरी पाटी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखेचा उदघाटण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद सरतापे होते. कार्यक्रमाची सुरुवात शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व महामानवांना अभिवादन करून करण्यात आली.
उदघाटण प्रसंगी बोलताना राजाभाऊ सरवदे साहेब म्हणाले, “फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चालणारा रिपब्लिकन पक्ष सर्व जाती-धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत आहे. या पक्षाचे कार्य हे शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक न्याय पोहोचवण्याचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवण्याचे कार्य रिपब्लिकन पार्टी करत आहे.”
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड पश्चिम महाराष्ट्र संघटक एस एम गायकवाड युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे जेष्ठ नेते आबा बनसोडे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,नितीन मोरे,युवक तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे,संघटन सचिव पोपट गेजगे,अकलुज शहराध्यक्ष अजित मोरे, युवक ता. सरचिटणीस प्रवीण साळवे,
संपर्कप्रमुख अण्णासाहेब भोसले,ता.मार्गदर्शक प्रा.भास्कर बनसोडे ता.उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके,ता.उपाध्यक्ष संजय भोसले, महेंद्र लोंढे,ता.उपाध्यक्ष रामभाऊ कांबळे,उपाध्यक्ष बाबुराव भोसले,गणेश सावंत,विश्वजित भालशंकर,असिफ शेख,संतोष बनसोडे,स्वप्नील सरवदे,दिलीप भोसले, रमेश भोसले,प्रताप लोंढे,महेश रणपिसे, विश्वतेज सरतापे उपस्थित होते.
दरम्यान नूतन शाखा अध्यक्षपदी गौतम वाघंबरे,उपाध्यक्ष अंबादास पवार, सरचिटणीस संजय इंगळे,सचिव संतोष जाधव,कार्याध्यक्ष आकाश वाघंबरे,संघटक शिवाजी वाघंबरे,खजिनदार शंकर जाधव,सहसचिव तायप्पा पवार, यांचा नियुक्ती बदल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
नवनाथ वाघंबरे औदुंबर वाघबरे, रामचंद्र पवार,संतोष वाघंबरे,मारुती वाघमोडे,यांनी मेहनत घेतली.