कृष्णप्रियोत्सव उत्सव-२०२५ जल्लोषात संपन्न कला, विज्ञान,कृषी दालनांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कृष्णप्रियोत्सव उत्सव-२०२५ जल्लोषात संपन्न कला, विज्ञान,कृषी दालनांना उत्स्फूर्त प्रतिसा
संचार वृत्त अपडेट
सदाशिवराव माने विद्यालयात २० व २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णप्रियोत्सव–२०२५’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप जल्लोषपूर्ण वातावरणात झाला. दोन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या बहारदार गीतसादरीकरणामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
✨ *प्रदर्शन दालनांना उत्स्फूर्त प्रतिसाद*
पहिल्या दिवशी विद्यालयातील चित्रकला, कृषी, विज्ञान, रांगोळी, पुष्परचना व भित्तीपत्रक या सहा दालनांचे प्रदर्शन भरविण्यात आले. माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय व द्विलक्षी विभागातील एकूण ५३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्वतःतील कल्पकता आणि कलागुणांचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
दुपार सत्रात स.म. शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवनच्या भव्य रंगमंचावर इयत्ता ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांनी १५ निवडक सांस्कृतिक गीतांचे दर्जेदार सादरीकरण केले. विविध वेशभूषा, नृत्यरचना आणि भावपूर्ण अभिव्यक्तींनी सादरीकरणाला वेगळेच तेज प्राप्त झाले.
✨ *सयाजीराजे वाद्यवृंदाची दमदार प्रस्तुती*
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सयाजीराजे वाद्यवृंदातील २५ बालकलाकारांनी दर्जेदार आठ गीते सादर केली. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात या कलाकारांना रु. ५००१/- चे बक्षीस देण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक सुहास पवार, बाळासाहेब झांबरे व स्नेहा शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या ज्ञानेश्वर शेलार सरांनी विनंती मान्य करून ‘या सुरांनो चंद्र व्हा…’ हे गीत सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
९ वी व ११ वी च्या गीतांनी रंगमंच बहरला
यानंतर इयत्ता ९ वी व ११ वी तील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, गोंधळी, धनगरी, वारकरी, राजस्थानी, कोळी, गुजराती, चित्रपट, प्रासंगिक अशा विविध गीतप्रकारांतील एकूण १८ गीते सादर केली.
दोन्ही गटांच्या प्रभावी, नेत्रदीपक आणि ऊर्जावान सादरीकरणामुळे प्रेक्षकांची टाळ्यांची दाद उसळून वाहत होती. चुरशीची स्पर्धा, नवनव्या कल्पना आणि कलात्मक प्रस्तुतीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली.

🏆 *गटवार गीतस्पर्धेचा निकाल*
*🎵 गट क्रमांक १ (इयत्ता ५ वी–६ वी)*
• प्रथम — ६ वी (इ, फ) : कोळी गीत
• द्वितीय — ६ वी (क, ड) : वाघ्यामुरळी गीत
• तृतीय — ६ वी (अ, ब) : महाराष्ट्र गीत
*🎵 गट क्रमांक २ (इयत्ता ७ वी–८ वी)
• प्रथम (विभागून) —
– ७ वी (क, ड) : चित्रपट गीत
– ८ वी (अ, ब) : आदिवासी गीत
• द्वितीय — ८ वी (इ, फ) : कॅसेट गीत
• तृतीय — ८ वी (ग, ह, ज) : धनगरी गीत
*🎵 गट क्रमांक ३ (इयत्ता ९ वी)
• प्रथम — ९ वी (ब) : चित्रपट गीत
• द्वितीय — ९ वी (ह) : वारकरी गीत
• तृतीय — ९ वी (ज) : कोळी गीत
*🎵 गट क्रमांक ४ (इयत्ता ११ वी)
• प्रथम (विभागून) —
– ११ वी (क) : शंभूवंदना
– ११ वी (फ) : शास्त्रीय संगीत
• द्वितीय – ११ वी (ई) : बॉलीवूड गीत
• तृतीय- ११ वी (ब): शिवगर्जना
•उत्तेजनार्थ- ११ वी (ग)
सर्व विजेत्या गटांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद आणि कलेबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
या उत्सवाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजी शिंदे अध्यक्ष म्हणून लाभले याप्रसंगी शि. प्र. मंडळाचे संचालक नारायण फुले, उत्कर्ष शेटे, पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, प्रशाला समिती सदस्य ॲड. रणजितसिंह माने-देशमुख, शिक्षक पालक संघांचे उपाध्यक्ष डॉ. अमोल शेंडगे, माता-पालक संघ उपाध्यक्षा गायत्री शेटे व सदस्यांची उपस्थिती लाभली.कला, विज्ञान, कृषी या दालनांचे परीक्षण एस.एम. शिंदे, एस.एस. भोसले, रमाकांत साठे, दीपक साळुंखे, तर सांस्कृतिक गीतांचे परीक्षण संगीत विशारद ज्ञानेश्वर शेलार यांनी केले.
मुख्याध्यापकांचे मनोगत
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन व आभार
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अनुराधा निंबाळकर, प्रतिभा राजगुरू, कृष्णा सरवदे व शैलेश माने-पाटील यांनी केले. निकालाचे वाचन उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी केले. सांस्कृतिक प्रमुख दिग्विजय जाधव व विविध गुणदर्शन प्रमुख मंगेश शिंगाडे यांनी सर्व समित्यांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.



