solapur

जनसामान्यांच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात; उर्वशीराजे मोहिते पाटील

जनसामान्यांच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात; उर्वशीराजे मोहिते पाटील

संचार वृत्त अपडेट 

पद्मजादेवी मोहिते पाटील व धवलसिंह मोहिते पाटील यांच्या साथीने विविध सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असताना अकलूज नगरपालिका निवडणुकीसाठी चार प्रभागातून प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगवेगळ्या स्थरातून आग्रह झाला त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार उर्वशी राजे मोहिते पाटील यांनी सांगितले.
सामाजिक काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबातील येणाऱ्या संपर्क वेळी शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते दिवाबत्ती व वाहतूक कोंडी अशा विविध अडचणी लोक बोलून दाखवत होते. प्रस्थापिताकडे अनेक वेळा नागरिकांना अडचणी सांगण्यात मर्यादा येतात. प्रस्थापित किंवा प्रशासन आणि सामान्य जनतेत संपर्क करण्यासाठी सर्वसामान्यांच्या मध्यस्थीची गरज पडते यावेळी चोख भूमिका बजावून सर्वसामान्यांना न्याय देणार असल्याचे उर्वशी राजे मोहिते पाटील यांनी सांगितले सर्व समाजाच्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमासह घरगुती कार्यक्रमात ही आमचा सहभाग असतो त्यामुळे प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणून मला नागरिक पसंती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माझ्या प्रभागात समर्थकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे असे त्यांनी यावेळी सांगितले अकलूज मधील मतदार हे आमचे कुटुंब आहे व त्यासाठी आम्ही काम करणार आहोत सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकासाचे कामे आम्ही करणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button