social

“ताहेरा फाउंडेशन” चा स्तुत्य उपक्रम.

अकलूज (प्रतिनिधी)
“ताहेरा फाउंडेशन” म्हटले की एक आशेची किरण निर्माण होते कारण ‘ताहेरा फाउंडेशन’ अनेक सामाजिक हिताचे उपक्रम राबवून समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे मग कोरोना काळातील गोरगरिबांना अन्नधान्याचे किट वाटप ,गरीब होतकरु महिलांना शिलाई मशीन वाटप , गरजु महिलांचा विमा करुन त्यांना आधार देणे , ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ,आपल्या हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना शिक्षण देऊन उंच शिखरावर पोहोचवणाऱ्या पालकांचा ‘ आदर्श पालक ‘ म्हणुन सन्मान करणे किंवा जे होतकरू गरीब कुटुंबातील विद्यार्थी असेल त्याला उच्च शिक्षणासाठी मदतीचा हातभार लावणे,

दरवर्षी उज्जवल यश प्राप्त करणाऱ्या गुणवांत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे , महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे एक ना अशा अनेक समाज उपयोगी विधायक उपक्रमास त्यांनी सदैव प्राधान्य दिले त्याच अनुषंगाने दिनांक 12 जुलै 2024 रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी निमित्त पालखीचे आगमन झाले आणि तमाम पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी त्याचे स्वागत केले परंतु या आषाढी वारीतील वारकऱ्यांना आवश्यकता कशाची आहे हे जाणून अकलूज पंचक्रोशीत सामाजिक कार्यात अर्गेसर असलेल्या ताहेरा फाउंडेशन च्या वतीने व माळशिरस तालुक्याचे जाणता राजा जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त या आषाढी वारीत पायी चालणाऱ्या वारकरी भाविका प्रति आपले काही देणे आहे

समजून त्या भाविक वारकऱ्यांना पावसापासून बचाव व्हावा या उद्देशाने ताहेरा फाउंडेशन च्या वतीने व श्रीमती विजया सुधाकर पंधे यांच्या शुभहस्ते छत्री चे वाटप करण्यात आले प्रारंभी नामवंत उद्योगपती संतोष सुधाकर पंधे व त्यांच्या सौभाग्यवती तसेच दिलीप किसनराव होनमाने आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात आली तसेच संत तुकाराम महाराज पालखीतील सहभागी झालेले व देहू येथून पायी आलेल्या वारकऱ्यांना माळीनगर रोड येथील गणेश मोटर्स येथे जेवणाची व राहण्याची सुविधा करण्यात आली होती

या कार्क्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या श्रीमती विजया सुधाकर पंधे यांचा सन्मान ताहेरा फाऊंडेशन चे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी दिंडी प्रमुख ह.भ.प. नारायण खेसे महाराज, उद्योगपती संतोष सुधाकर पंधे (संगम )धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप होनमाने, ताहेरा फाउंडेशनचे ,अध्यक्ष -हाजी अबूबकर भाई तांबोळी, तसेच मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते
उपस्थित वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ॲड. स्वप्निल होनमाने, छगन निचळ, कामिल शेख ,अमोल घुले ,संतोष रणदिवे, रवी सोनवणे, यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button