solapur
श्रीमती कृष्णाई गोविंदरावराव अंधारे यांचे निधन.
अकलूज (प्रतिनिधी)संग्रामनगर (ता.माळशिरस) येथील श्रीमती कृष्णाई गोविंदराव अंधारे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्या ९५ वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सूना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.अकलूज येथील सुमित्रा पत संस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे यांच्या त्या आई होत्या.प्रतिकुल परिस्थितीमध्ये मुलांना विविध क्षेत्रात मोठे करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपूर दोनदा पायी वारी केली होती तर आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात एकदा पायी वारी केली होती.कुलगुरू,प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.