solapur

माळशिरस तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आ.रणजितसिंह यांचे नेतृत्वाखाली लढवीणार जयसिंह मोहिते पाटील यांची घोषणा

संचार वृत्त अपडेट 

येत्या डिसेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन तसेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी काही महिने राहिली आहे त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी ची मुदत संपल्यानंतर त्यांचे राजकीय भवितव्य काय हा सारासार दुरदृष्टी विचार असलेले माळशिरस तालुक्यातील राजकीय सामाजिक चाणक्य नीती अशी ओळख असलेले जयसिंह उर्फ बाळदादा यांनी आज सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे गाळप शुभारंभ कार्यक्रमात नविन चाल व खेळी उपस्थित कार्यकर्ते नेते यांच्यासमोर खेळली आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत तसेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे आमदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांचे राजकीय भवितव्य काय हा विचार करून चाणाक्ष बाळदादा यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की येत्या स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका आम्ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली लढणार आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांत एकच खळबळ उडाली आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्कं माहीत आहे माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्यातील काही जागा मोहिते पाटील यांचे वर्चस्वाखाली पंचायत समिती जिल्हा परिषद समिती मध्ये हमखास निवडून येतात मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे सक्रिय नेते आहेत मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ला घवघवीत यश मिळाले आहे तसेच विधानसभा निवडणुकीत ही यश मिळाले आहे त्यामुळे निम्म्या सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील हाच पक्ष हेच नेतृत्व अशी स्थिती आहे त्यामुळे इथं कोणता राजकीय पक्ष टिकू शकत नाही या एकंदरीत परिस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे वर्चस्व प्रस्थापित होणार ही काळया दगडावरची रेष आहे मात्र लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्याने माढा लोकसभा मतदारसंघात निवडुन आणले आहे मात्र त्या वेळी एकटे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सोडले तर संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब व त्यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी मध्ये सक्रिय राहून निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले आहे आता आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढवून भाजपला मदत करण्यासाठी जयसिंह उर्फ बाळदादा यांनी निर्णय घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व जागा जिल्हा परिषद पंचायत समिती ची सत्ता कशी येईल ही जबाबदारी दिली आहे अशी चर्चा नागरिकातून होत.तरच भविष्यात तुमचे राजकीय भवितव्य ठरणार आहे ही दोलायमान वस्तुस्थिती लक्षात घेता मोहिते पाटील घराणे हे समाजकारण राजकारण यामध्ये निष्णात आहेत कोणत्या वेळी कोणती चाल खेळायची यात ते माहीर आहेत अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत मात्र स्थानिक पातळीवर विकास आघाडी करून निवडणूक लढणार अशी गोपनीय माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button