हर हर महादेव नामघोषात अकलूजमध्ये कावडीनी ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली.

हर हर महादेव नामघोषात अकलूजमध्ये कावडीनी ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (संजय लोहकरे यांजकडून)
अकलूज येथे चैत्री पाडव्याच्या मुहूर्तावर कावड्यांना वस्र परिधान करून नीरा नदीचे पाणी कावडीमध्ये भरून हलगी व ढोलकीच्या तालावर शहरातून भव्य ग्रामप्रदक्षणा काढून अकलूजमधील सर्व मंदिरात कावडीचे पाण्याची धार घालून दर्शन घेतले.देवांग कोष्टी समाज कावडीचे मानकरी असलेले हेमंत टेके यांच्या घरासमोर सुहासिनी महिलांनी कावडीची विधीवत पुजा करून दर्शन घेतले तर तरूण वर्गांनी खांद्यावर कावड घेऊन हलगीच्या तालावर ठेका धरून नृत्य करत मनमुराद आनंद घेतला.
शिखर शिंगणापूर (ता.दहीवडी) येथील शंभू महादेवाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातून विविध जिल्हातून व ग्रामीण भागातून शंभू महादेवाचे भक्त कावड खांद्यावर शिखर शिंगणापूरची पायी चालत निघतात.व्दादशी दिवशी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कावडी शंभू महादेवावर पाणी घालतात तर पोर्णिमेच्या दिवशी यात्रेची सांगता होते.लांब पल्ल्याच्या कावडी आजपासून शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ होत असतात.अकलूज येथील टेके परिवाराने सुरू केलेली कावड व देवांग कोष्टी समाज यांच्या सहकार्याने गेल्या तीन पिढ्यापासून कावडीची परंपरा जपली आहे.चालू वर्ष हे या कावडीचे ७६ वर्ष सुरू आहे. दिनांक १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिवशी व पोर्णिमेनिमित्त कावडीतील लोकांसाठी,आप्तेष्ट मित्र परिवारासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कावडीचा यशस्वी पार पडण्यासाठी हेमंत टेके,विलास भरते,रविन्द्र टेके,सुनिल टेके, आकाश टेके,योगीराज टेके, काशिनाथ बारवे,सागर उपासे, विनय उंट,देवांश टेके,नितीन टेके,साईराज टेके,निलेश टेके, नितीन इंगोले,महेश कोतमीरे, रामचंद्र लोखंडे,नवनाथ सुर्यवंशी, रफिक पठाण,जितूराज माळी, अतुल उपासे,सौरभ उपासे, कार्तिक बाप्ते परिश्रम घेत आहेत.