तोंडले गावाच्या दिनकर क्षीरसागर यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड

तोंडले गावाच्या दिनकर क्षीरसागर यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड
संचार वृत्त अपडेट
तोंडले (ता. माळशिरस) येथील भूमिपुत्र *दिनकर अंकुश क्षीरसागर* यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दिनकर क्षीरसागर यांचे वडील शेतकरी, तर आई गृहिणी आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत कठोर परिश्रम, आत्मसंयम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गावाचा गौरव वाढला असून, ते तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
दिनकर यांच्या निवडीबद्दल गावकरी, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षकवर्गाने* त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.