अकलूज येथे निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व सना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जीपिकॉन २०२५ संपन्न

अकलूज येथे निमा संघटना, होमिओपॅथी संघटना व सना हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिपीकाॅन २०२५ संपन्न
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्यातील निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व सना हॉस्पिटल कोंडवा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिपीकॉन २०२५ चे आयोजन कृष्णप्रिया हॉल अकलूज येथे करण्यात आले होते.
मेडिकल क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत असल्यामुळे त्याचे ज्ञान अवगत करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते.मेडिकल क्षेत्रात रोबोटच्या सहाय्याने अनेक सर्जरी केल्या जातात. त्यामध्ये रोबोटीक जॉईंट रिप्लेसमेंट ही सर्जरी खूपच यशस्वी होताना दिसत आहे. रोबोटीक जॉईंट रिप्लेसमेंट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील सना हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ.सुहेल खान यांचे बेसिक्स ऑफ जॉइंट रिप्लेसमेंट अँड प्रॅक्टिकल विडिओ या विषयावरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ऑटोमॅटिक रोबोटीक जॉइंट रिप्लेसमेंटमुळे सांध्याचा जेवढा भाग खराब झाला आहे.त्याचे मेजरमेन्ट कॉम्प्युटरच्या सहाय्याने घेतले जातात व रोबोटच्या सहायाने तेवढाच भाग काढून तेथे कृत्रिम सांधा कशा प्रकारे बसवला जातो.त्याचे रुग्णांना कशा प्रकारे फायदे होतात.याबद्दलचे मार्गदर्शन डॉ सुहेल खान यांनी केले.यावेळी अकलूजचे सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ.अमोल शिंदे,डॉ विश्वास कदम फिजिशियन डॉ. समीर दोशी उपस्थित होते.डॉ. सौ.शुभांगी माने-देशमुख यांनी डॉ सुहेल खान यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिलीप पवार यांनी केले तर आभार निमाचे अध्यक्ष डॉ.अमोल माने शेंडगे यांनी मानले सुहास उरवणे व गुजर सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमासाठी नातेपुते ते नेवरे येथून बहुसंखेने डॉक्टरर्स उपस्थित होते तसेच महिला डॉक्टरर्स यांचीही बहुसंख्येने उपस्थिती होती.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी निमाचे अध्यक्ष डॉ.अमोल माने-शेंडगे,निमा वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.विद्या एकतपुरे व निमा टीम तसेच होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.अभिजित राजे भोसले , होमिओपॅथी वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.वैष्णवी शेटे व होमिओपॅथी टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.