solapur

एक रकमी एफआरपी देण्यास साखर संघाची आडकाटी संघ शेतकऱ्यांचे प्रति टन एका रुपयाप्रमाणे वर्षाला पाच कोटी घेते ; राजू शेट्टी

एक रकमी एफआरपी देण्यास साखर संघाची आडकाटी संघ शेतकऱ्यांचे प्रति टन एका रुपयाप्रमाणे वर्षाला पाच कोटी घेते ; राजू शेट्टी

संचार वृत्त अपडेट 

 राज्य सरकारने उसाच्या एफआरपीचे दोन टप्पे केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर  काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, राज्य सहकारी साखरसंघाने ‘निर्णय घेण्याआधी आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे’ अशी भूमिका घेत हस्तक्षेप केला. यामुळे एफआरपीचा फैसला काहीसा पुढे ढकलला आहे.

केंद्राच्या ऊस नियंत्रण कायद्यान्वये गतहंगामाचा उतारा विचारात घेऊन एकरकमी एफआरपी (रास्त व उचित दर) ऊस तुटल्यावर चौदा दिवसात अदा केली जात होती.(महाविकास आघाडी)राज्य सरकारने फेब्रुवारी २०२२ मध्ये नवा आदेश काढला. १०.२५ टक्के या पायाभूत उताऱ्यानुसार पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर त्याच हंगामाच्या अंतिम उताऱ्यानुसार उर्वरित हप्ता द्यायचा निर्णय घेतला. याविरोधात राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जुलै २०२२ मध्ये साखरसंघानेही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. मात्र आजअखेरपर्यंत त्याचा पाठपुरावा केला नव्हता. दरम्यान, आठवडाभरात चार सुनावण्या पार पडल्या. न्यायालयाने राज्यसरकारवर कडक शब्दात ताशेरेही ओढले. त्यामुळे आज निर्णयाचीच शक्यता होतो. अशात साखरसंघाने हस्तक्षेप केल्याने येत्या मंगळवारी पुन्हा यावर वाद-प्रतिवाद झडणार आहेत.

याचिकाकत्यांचे वकील अॅड. योगेश पांडे म्हणाले, आम्ही आणि सरकारने आज आपापले म्हणणे सादर केले होते. नवा आदेश रद्द होण्याचीच भूमिका लावून धरली होती.

साखरसंघाचे सचिव संजय खताळ म्हणाले, यापूर्वीच याचिका केलेली होती मात्र आठवडाभरात विषय अॅक्टीव्ह मोडवर आल्याने आज कुठलाही निर्णय घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकावे अशी विनंती न्यायालयाला केली, ऊस नियंत्रण कायद्यान्वये चौदा दिवसात एफआरपी देण्यास समर्थनच आहे. मात्र ‘पायाभूत उताऱ्यानुसारची एफआरपी आणि त्यापेक्षा अधिकच्या उताऱ्यावरील प्रीमियम’ यातला फरक समजून घेतला पाहिजे. त्या त्या वर्षांचा उतारा गृहित धरून भाव मिळाल्याने शेतकऱ्याचा फायदाच आहे.

सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहित्यावर याचिकेस गती आली होती. साखरसंघ शेतकयांचे प्रतिटन एका रुपयाप्रमाणे वर्षाला पाच कोटी घेतात. यांनी कारखाने आजारी का पडतात यावर किंवा कसे विकले जातात? यावर किंवा जीवघेण्या स्पर्धेबाबत डोळ्यात अंजन घालणारा अहवाल कधी केला का? मग शेतकऱ्याला पैसे मिळण्याच्या वेळीच नेमका साखरसंघ मध्ये कसा पडतो ?

राजू शेट्टी, शेतकरी नेते

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button