पुरंदावडे जि.प. शाळेतील हस्ताक्षर स्पर्धेत आदित्य ओवाळ जिल्ह्यात प्रथम तर जीविका ओवाळ हिचा दुसरा क्रमांक

पुरंदावडे जि. प. शाळेतील हस्ताक्षर स्पर्धेत आदिती ओवाळ जिल्ह्यात प्रथम व जिविका ओवाळ हिचा दुसरा क्रमांक!
संचार वृत्त अपडेट
पुरंदावडे (प्रा अर्जुन ओवाळ) महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा सोलापूर आयोजित करण्यात आलेल्या हस्तक्षर स्पर्धेत पुरंदावडे जि. प. शाळेतील कु. आदिती अजित ओवाळ हिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. कु. जिविका राहुल ओवाळ हिचा तालुका स्तरावर दुसरा क्रमांक आला आहे.
पुरंदावडे ग्रामपंचायतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात श्री. शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर चे संचालक श्री. महादेव शिंदे, मा.श्री.भगवान पिसे,सरपंच सौ. राणी मोहिते,उपसरपंच श्री. देविदास ढोपे ईत्यादी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. झाला. समर्थ श्रीकांत सावंत यांने बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
श्री. पोपट गरगडे यांचे भाषण झाले. विजेत्या स्पर्धेकांच्या आई आयु. सुनिता अजित ओवाळ, दिक्षा राहुल ओवाळ व सुजाता श्रीकांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
जि. प. शाळेत पार पडलेल्या समारंभासाठी मा. सरपंच बापू ऐवळे. मा. मुख्याध्यापक अण्णासाहेब फाळके, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी ओवाळ, आर. पि. आय तालुका उपाध्यक्ष शेखर सावंत, लक्ष्मण ऐवळे, महादेव बोराटे, शा. व्य. स. उपाक्ष्यक्ष दत्तात्रय पालवे, कोमल मोहिते, वंदना ऐवळे, रेखा ओवाळ, जनार्दन शिंदे, मंगेश कुलकर्णी, दादा मोहिते, दादा ऐवळे, सुदाम ढगे, मारुती ओवाळ,
पत्रकार प्रा अर्जुन ओवाळ, शिक्षक सौ. बोत्रे, सौ. साळवे, सौ.कवता कोळेकर, सौ.आशा नाळे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक मा. श्री. रमजान शेख यांनी केले.