solapur
हाजी रसूल मोहिद्दीन नदाफ यांचे निधन

हाजी रसूल मोहिद्दीन नदाफ यांचे वृद्धापकाळाने निधन
संचार वृत्त अपडेट
शंकरनगर-अकलूज (स्वरूपनगर) येथील हाजी रसूल मोहियोद्दीन नदाफ यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ५ मुले, सुना ,नातवंडे ,असा परिवार असून अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाचे व्यवस्थापक जिब्राईल नदाफ यांचे ते वडील होत .
हाजी रसुल साब हे धार्मिक व मनमिळावु स्वभावाचे होते. अकलूज येथील (कब्रस्तान) दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला.सर्व थरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.