अकलूज मध्ये त्याग मूर्ती माता रमाई ची जयंती उत्साहात साजरी

अकलूज मध्ये त्यागमूर्ती माता रमाई ची जयंती उत्साहात साजरी केली
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील अकलूज मध्ये त्याग मूर्ती माता रमाईचे 127 वी जयंती रमामाता महिला मंडळातर्फे मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने व अन्नदानाने करण्यात आले त्याग मूर्ती माता रमाई चा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला रमाई ही त्यांच्या वडिलांची सर्वात लहान मुलगी होती लहान असतानाच त्यांची आई मरण पावली प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते त्याग मूर्ती रमाई देखील अशा प्रेरणादायी स्त्रीपैकीच एक होत्या म्हणूनच संसारातील कठीण प्रसंगात ही संघर्ष त्याग आणि बलिदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर व विश्वभूषण झाले यावेळी माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन स्त्रियांकडून करण्यात आले
तसेच ध्वजवंदनाचा कार्यक्रम महिलांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी अशोक दादा गायकवाड व बी एल गुरुजी यांनी माता रमाई बद्दल आपले विचार मांडले प्राध्यापक आशा ताई गायकवाड म्हणाले की अशी साथ आमच्या रमामाता महिला मंडळाच्या विविध सामाजिक कार्यास सर्व वडीलधाऱ्या व रमामाता मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिळाले अशी अपेक्षा व्यक्त केली संध्याकाळी त्यागमूर्ती माता रमाईच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे ची मिरवणूक अकलूज शहरातून काढण्यात आली त्यावेळी हजारो महिलांनी उत्साहाने भाग घेतला तसेच रमामाता तरुण मंडळातील उत्साही कार्यकर्त्यांनी जबाबदारी ने व उत्साहाने मिरवणूक पार पाडली त्यावेळी अकलूज पोलीस स्टेशन ने चोख बंदोबस्त ठेवला होता.