युवकाच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक अकलूज पोलीसांची दमदार कामगिरी

युवकाच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक अकलूज पोलीसांची दमदार कामगिरी
संचार वृत्त अपडेट
दिनांक २२/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास अकलूज शहरातील शनी घाट, निरा नदीच्या पात्रामध्ये मेघराज युवराज हिलाल वय २१ वर्षे, रा. काझी गल्ली, अकलूज या युवकाचा मतृदेह नदीपात्रामध्ये मिळून आला होता. त्यावरून अकलुज पोलीस ठाणेस अपमृत्यु नोंद नं ८०/२०२५ प्रमाणे नोंद करण्यात येवुन सदर मयताची चौकशी पोहेकॉ / ९७८ अमोल बकाल करीत होते. पुढील तपासाबाबत मार्गदर्शक सुचना मा. पोलीस अधिक्षक . अतुल कुलकर्णी साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर साो व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी . संतोष वाळके साो अकलुज विभाग अकलुज यांनी दिल्या होत्या. सदर चौकशीमध्ये साक्षीदार यांचेकडे तपास, सी. सी.टी.व्ही फुटेज व तांत्रीक तपासाचे आधारे मयत मेघराज युवराज हिलाल याचा मृत्यु हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले. तपासामध्ये आरोपी नामे. १) रोहीत रघुनाथ क्षत्रीय, २) राहूल रघूनाथ क्षत्रीय, ३) रोहन सुनिल शिंदे रा. सर्वजन काझी गल्ली, अकलूज यांनी यांनी दिनांक २१/१०/२०२५ रोजी रात्री ११.३० वाजच्या सुमारास मयत युवक व आरोपी यांच्यात वाद झाल्याचे कारणावरून त्यास जबरदस्तीने निरा नदीच्या पात्रामध्ये नेवून पाण्यामध्ये बडवून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे गुन्हा केल्यापासून परागंदा झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने अकलुज पोलीस ठाणे कडील सपोनि योगेश लंगुटे यांचे नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपी १) रोहीत रघुनाथ क्षत्रीय, २) राहूल रघूनाथ क्षत्रीय यांना वाशी जि. धाराशिव या ठिकाणावरून ताब्यात घेतले असुन आरोपी नं ३ रोहन सुनिल शिंदे यास अकलुज येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील आरोपी यांचेकडे तपास करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक . अतुल कुलकर्णी साो, मा. अपर पोलीस अधिक्षक, . प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग,. संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक . निरज उबाळे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोहेकॉ/९७८ अमोल बकाल, पोहेकों / १४०७ समीर पठाण, पोहेकॉ १५८९/शिवकुमार मदभावी, पोहेकॉ/१०९८ विक्रम घाटगे, पोहेकॉ / १५३३ तुषार गाडे, पोहेकॉ/१८२७ कंठोळी, पो कॉ/५१ रणजीत जगताप यांनी केलेली आहे.



