solapur

बॉयलर पेटले… ऊस शेतकरी सज्ज ! यंदा गळीत हंगाम लवकर दरा बाबतची उत्सुकता अजून कायम

बॉयलर पेटले… ऊस शेतकरी सज्ज ! यंदा गळीत हंगाम लवकर दरा बाबतची उत्सुकता अजून कायम

संचार वृत्त अपडेट 

दिवाळीनंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष ऊस गळीत हंगामाकडे लागले आहे. माळशिरस तालुक्यात साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून हंगामाला सुरुवात झाली आहे वाढलेल्या एफ आर पी मुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी दराबाबतची उत्सुकता अजून कायम आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही ऊस उत्पादक शेतकरी गळत गळीत हंगामाची तयारी करत आहे शेतकरी ऊस वाहतुकीसाठी तोडणीसाठी आणि गाळपासाठी सज्ज झाले आहेत.

यंदाचा गळित हंगाम लवकर सुरू
गेल्यावर्षी शासनाकडून गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय झाला होता मात्र यंदा 15 दिवस आधी म्हणजेच एक नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे याचे कारण म्हणजे काही कारखान्याने लवकर गाळप सुरू करण्याची तयारी केली होती ऊस सध्या योग्य परिपक्व अवस्थेत असल्याने शेतकरी ऊस वाहतुकीसाठी सज्ज आहेत हंगाम साधारण 150 ते 160 दिवस चालण्याची शक्यता आहे

दराबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्कंठा
दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना सर्वाधिक उत्सुकता आहे ती उसाच्या दराबाबत 2024/25 साठी केंद्र सरकारने एफ आर पी प्रति टन 3400/- निश्चित केली होती तर २०२५/२६ हंगामासाठी एफ आर पी 150/- ने वाढ करून ती ३५५०/- प्रति टन करण्यात आली आहे. वाहतूक खर्च, तोडणी खर्च आणि उतारा यांचा अंतिम दरावर परिणाम होणार आहे त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांना किती दर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसाचा परिणाम 
यावर्षी पावसाने अनेक ठिकाणी थैमान घातल्याने काही भागात उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे काही शेतकऱ्यांना पाणी साचल्याने उत्पादन घटनेची भीती वाटत आहे तरीही बहुतांश भागात ऊस समाधानकारक स्थितीत असल्याने उत्पादन अपेक्षित पातळीवर राहील असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
शेतकरी सज्ज 
सध्या माळशिरस तालुक्यातील परिसरात तोडणीसाठी कामगारांचे बुकिंग वाहतुकीसाठी ट्रक व ट्रॅक्टर व्यवस्था तसेच कारखान्याकडून ऊस वाहतुकीच्या परवानग्या घेतल्या जात आहेत ऊस उत्पादक शेतकरी आता प्रत्यक्ष हंगामाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू होत असला तरी उत्पादनातील घट आणि खर्चातील वाढ यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनिश्चिततेचे वातावरण आहे वाढलेल्या एफआरपीमुळे थोडासा दिलासा मिळालेला असला तरी कारखान्याकडून योग्य दर मिळणे हा अजूनही शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

सोलापूर जिल्ह्यात अद्याप उसाचा दर जाहीर झालेला नाही ऊस दर नियंत्रण समितीने उसाचा दर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांना गाळपाचा परवाना देऊ नये अशी आमची मागणी आहे. यापूर्वी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे त्यांनी तातडीने बैठक घेऊन हा विषय सोडवणे अपेक्षित होते त्यामुळे मी स्वतः आता साखर आयुक्तांना जाऊन भेटणार आहे. तसेच येत्या दहा दिवसात ऊस दर जाहीर करावा. अन्यथा साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालकांच्या दारासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांचे नेते प्रा.सुहास पाटील (सदस्य- ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य) यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button