solapur
कृषी सहाय्यक संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनास राजू शेट्टी करणार मदत ; अजित बोरकर

कृषी सहाय्यक संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनास राजू शेट्टी करणार मदत ; अजित बोरकर
संचार वृत्त अपडेट
महाराष्ट्र राज्यातील कृषी सहाय्यक यांचा सुरू असलेला राज्यव्यापी बेमुदतसंपा संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांची माळशिरस येथील महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना सोलापुर जिल्हा प्रतिनिधी संतोष बंडगर व प्रमुख कृषी सहायकांनी भेट घेऊन चालू असलेल्या संपाबाबत चर्चा केली सोबत कृषी सहाय्यक यांच्या मागण्याचे निवेदन अजित बोरकर यांना दिले त्यासोबत शेतकऱ्यांचे दैवत मा. खासदार राजू शेट्टी यांच्या सोबत दूरध्वनीवरून संपर्क करून कृषी सहाय्यक यांच्या संदर्भातिल मागण्या सांगितल्या त्या सर्व मागण्या रास्त व योग्य असुन साहेबांनी तात्काळ या मागण्याची दखल घेऊन राज्य सरकारशी संवाद साधुन पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.