solapur

अवकाळी ने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तहसीलदारांना निवेदन

अवकाळी ने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तहसीलदारांना निवेदन

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस तालुक्यात अनेक भागात गेल्या आठ दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले शेतामधील डाळिंब आंबा कांदा ऊस या पिकासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे गतवर्षीच्या दुष्काळातून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा एक महिना अगोदर अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी कोलमोडून गेला आहे आंबा बागेतील आंबा उतरण्याचे काम चालू असतानाच पाऊस आल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जनावरांसाठी चारा असलेले कडवळ व इतर चारा पीके पाण्याखाली वाहून गेले आहे.तसेच डाळिंबाच्या बागेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. या अवकाळी पाऊस शेतकऱ्यावर कोपला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला असून या अवकाळी संकटामुळे शेतकरी हातबल झाला आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने अवकाळी पावसामुळे झालेल्या संपूर्ण माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी.
यावेळी अजित बोरकर ज्येष्ठ नेते मगन काळे,सचिन शेंडगे, गोपाळ घार्गे अमरसिंह माने -देशमुख राष्ट्रवादीचे शामराव बंडगर,सोमनाथ पिसे अशोक शिंदे मुकुंद काळे,तेजस भाकरे शिवाजी वाघमारे विश्वजीत अडसूळ विकास काळे शंकर पवार प्रदीप ठवरे विजय वाघंबरे यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..

सरकारने झालेल्या नुकसानाची जे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अन्यथा सरकारला शेतकऱ्याच्या रोशाला सामोरे जावे लागेल

स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button