solapur

समाजकल्याणच्या सभापती सातपुते यांनी केली झाडाझडती

समाजकल्याणच्या सभापती सातपुते यांनी केली झाडाझडती

संचार वृत्त अपडेट 

 जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती । संस्कृती राम सातपुते यांनी अचानकच कार्यालयाच्या दप्तराची तपासणी करून झाडाझडती घेतली. या तपासणीमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. गुरूवारी सभापती सातपुते या आल्या असता त्यांनी समाजकल्याण विभागात जावून तपासणी केली. यावेळी दलित वस्तीच्या कामाची वही हातून घेवून तपासणी केली. गेल्या अनेक वर्षापासून समाजकल्याण विभागातील समाजकल्याण अधिकाऱ्यांचा पदभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर चालला आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागातील कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता सभापती आल्यापासूनसमाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. सभापती सातपुते यांनी लक्ष दिल्यानंतर समाजकल्याण विभागाला शिस्त लागण्याची आशा आहे. त्यासाठी दलित वस्ती, वस्तीगृह, अतंर जातीय विवाह अशा लक्ष महत्वाच्या विषयाकडे देण्याची गरज आहे. तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्याही बरेच रिक्त आहेत. पूर्ण वेळ अधिकारी येत नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांनाही नाईलाजस्व पदभार पहावा लागत आहे. त्यामुळे कामातील दिरंगाई दिवसेंदिवस वाढत असली तरी सातपुते ताळमेळ घालत असून कामकाजात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa