solapur

समाज कारणात सक्रिय जनहितासाठी तत्पर ; अमोल माने यांचा वाढदिवस विशेष !

समाज कारणात सक्रिय जनहितासाठी तत्पर ; अमोल माने यांचा वाढदिवस विशेष !

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पक्षाचे  अकलूज शहर सरचिटणीस अमोल माने यांना वाढदिवसानिमित्त भाजपा अकलूज मंडलाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल माने हे अकलूज शहरातील सामाजिक चळवळीत सक्रियपणे कार्यरत असून, सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने पुढाकार घेणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यासोबतच नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, स्थानिक प्रश्नांवर आवाज उठविणे आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, अशा विविध माध्यमांतून ते आपले योगदान देत आहेत.

भाजपाचे अकलूज शहर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सहभाग नोंदविला आहे. सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्काच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असते. या दृष्टीने अमोल माने यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.वाढदिवसानिमित्त भाजपा अकलूज मंडलाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा अकलूज मंडलाध्यक्ष सुजय माने-पाटील, नगरसेवक महेश शिंदे, युवा नेते बाबा गायकवाड, अमित टिळेकर, संजय खुडे, समीर माने, मुकेश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.तर माळशिरस नगरपंचायतीचे माजी 

नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,भाजपा अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे,जयराम माने पाटील,
अमरसिंह देशमुख,सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे नागपूर,पिलीव भाजप शाखेचे अध्यक्ष बाजीराव जाधव आदी मान्यवरांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या.भाजप युवा नेते विक्रांत देशमाने,शशिकांत रणवरे,रोहित कुलकर्णी,सुशील देशमाने उपस्थित यांनी व इतर सर्व भाजप कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांनी अमोल माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक कार्यातील त्यांचा उत्साह असाच कायम राहून त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य घडत राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या शुभेच्छा कार्यक्रमातून अमोल माने यांच्याप्रती असलेला स्नेह आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अधोरेखित झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button