solapur

लोकसंख्या वाढली पाणी तेवढेच ! माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी फोडले पाणीटंचाईचे बिग

लोकसंख्या वाढली पाणी तेवढेच !
माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी फोडले पाणीटंचाईचे बिग

संचार वृत्त अपडेट 

शहरातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी थेट नगर परिषदेत धाव घेत मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याशी चर्चा केली. वाढती लोकसंख्या आणि अपुरे पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना माने पाटील यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवल्या. अकलूजची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामानाने पाणीपुरवठा मात्र तेवढाच आहे. त्यामुळे तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागेल असे ते म्हणाले.त्यांनी नगर परिषदेच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या बोरिंगचा मुद्दा उपस्थित केला. शहरात 46 बोअर आहेत. त्यापैकी किती बंद आहेत याचा आढावा घेऊन तातडीने ते चालू करावेत. कूप नलिकेचे एडिट करून बंद अवस्थेत असणारे बोरिंग दुरुस्त करून पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली.पाणी बचतीसाठी जनजागृती करणेही गरजेचे असल्याचे सांगत माने पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी भांडी धुण्यावर बंदी घालावी, असा सल्ला दिला. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबवावे लागेल.झोपडपट्टी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी खास योजना सुचवली.झोपडपट्टी भागात टाक्या बसवून रात्री टँकरद्वारे त्यामध्ये पाणी भरावे. रात्री भरलेले पाणी दिवसा लोकांना वापरासाठी सोयीचे होईल. यामुळे पाणी वाटपाचा ताणही कमी होईल असे त्यांनी सांगितले.बंद बोरिंग चालू करणे, टाक्यांद्वारे रात्री पाणी साठवणूक आणि जनजागृती या त्रिसूत्रीने भीषण पाणीटंचाईवर मात करता येईल, असा विश्वास माजी सरपंचांनी व्यक्त केला. मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी त्यांच्या सूचनांची नोंद घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्रिंबक गुळवे,विठ्ठल गायकवाड,सुरेश देशपांडे,शिरीष देशपांडे व नगरपरिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button