solapur

एकतपुरेंच्या पुढाकाराने सावता मंदिर व शाळेचा पाणी प्रश्न सुटला

एकतपुरेंच्या पुढाकाराने सावता मंदिर व शाळेचा पाणी प्रश्न सुटला

संचार वृत्त अपडेट 

माळेवाडी येथील संत सावता मंदिर व जिल्हा परिषद शाळा परिसरात गेल्या वर्षभरापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नादुरुस्त होती. एकच कनेक्शन असल्याने भाविक आणि शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.
नगरसेविका जयश्री एकतपुरे यांनी या गंभीर समस्येची दखल घेत तातडीने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता संत सावता मंदिर आणि जिल्हा परिषद शाळा या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र जलवाहिनी कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नगरसेविका एकतपुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. कामगारांकडून खोदकाम करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करून घेतले.स्वतंत्र कनेक्शनमुळे आता शाळेतील विद्यार्थ्यांना आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित मिळणार आहे. पाण्याची समस्या कायमची मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे एकतपुरे यांच्या प्रयत्नांमुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शाळेतील विद्यार्थी आणि मंदिरातील भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button