solapur

आरपीआय चे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्यावर राजकीय सूड घेण्यासाठी खोट्या कारवाई मागे कोणाचं षडयंत्र आहे हे तपासण्याची गरज

आरपीआय चे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्यावर राजकीय सूड घेण्यासाठी खोट्या कारवाई मागे कोणाचं षडयंत्र आहे हे तपासण्याची गरज

संचार वृत्त अपडेट

श्रीपूर (बी.टी.शिवशरण)

आरपीआय आठवले गट महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज व सामाजिक राजकीय चळवळीतील अभ्यासू परखड नेतृत्व फर्डे वक्ते म्हणून आपली ओळख महाराष्ट्राला असणारे खंबीर व ज्वलंत विचारधारा जनमानसात रुजवणारे धाडसी नेते तसेच विरोधकांना जातीवादी धर्मांध प्रवृत्तींना वेळोवेळी उघडे पाडून त्यांचे मनसुबे उधळणारे सन्माननीय नंदकुमार केंगार यांच्या घरी ते नसताना खोट्या माहितीच्या आधारावर बेकायदा कारवाई करण्यासाठी त्यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता तसेच कायदेशीर नोटीस न देता घरात घुसून अत्यंत उर्मट व उद्धट वर्तणूक करून घरातील महिलांना अपमानास्पद वागणूक व उद्धट वर्तन करुन घरातील झाडाझडती घेतली मात्र प्रत्यक्षात धाड घालायला आलेल्या अधिकार्यांना काहीही सापडले नाही घरात बेकायदा दारुसाठा ठेवल्याची खोटी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कोणीतरी दिली व त्या अधिकार्यानी कोणतीही खातरजमा न करता एका सभ्य प्रतिष्ठीत व आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्षाचे जबाबदार पदाधिकारी व गावांत प्रतिष्ठा असलेल्या नंदकुमार केंगार यांच्या घरी जाऊन खोटी कारवाई केल्याने केंगार कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबांच्या स्वाभिमानी समाजातील कार्यकर्त्यांवर हा फार मोठा आघात आहे यामध्ये आम्हाला राजकीय हस्तक्षेप व तालुक्यातील विरोधी नेते कार्यकर्ते यांचा तर या मध्ये हात नाही ना याची दाट शक्यता वाटते आहे कारण नंदकुमार केंगार हे स्पष्ट निर्भीड वक्ते आहेत गत निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर बोलताना त्यांच्या काही बाबींवर अत्यंत स्पष्ट व परखड टिका केली आहे त्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुकीत केंगार यांनी विरोधकांना आपल्या भाषणातून पळता भुई केली होती त्याचीच दाट शक्यता वाटते कारण हल्ली देशात राज्यात इडी खोट्या कारवाई तसेच दबावतंत्राचा वापर केला जातो आहे ही शक्यता नाकारता येत नाही या मागे नक्की कोणाच्या हात आहे हे तपासण्याची गरज आहे अबकारी खातें यांच्याकडे कोणाची लेखी तक्रार आहे तसेच त्यांना कोणी माहिती दिली याची कसून चौकशी झाली पाहिजे केंगार कुटुंबाला झालेला मनस्ताप त्यांची मानहानी बदनामी ही कशातच भरुन येणार नाही त्यामुळे याचा बोलावता धनी कोण आहे हे शोधलेच पाहिजे येत्या वीस जून रोजी अकलूज येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या समोर केंगार कुटुंब आत्मक्लेश म्हणून दिवसभर धरणे आंदोलन करणार आहेत त्यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून मागासवर्गीय संघटना बहुजन चळवळीतील ज्येष्ठ मान्यवर नेते कार्यकर्ते यांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button