solapur

नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे ; सचिन पाटील

 नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे ; सचिन पाटील

संचार वृत्त अपडेट 

सध्या माळशिरस तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे व सध्या धरणातील उपलब्ध पाण्याचा साठा याचा विचार करता अकलूजच्या नागरिकांनी नगरपरिषदेच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.
जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला तरी माळशिरस तालुक्यात पावसाचे आगमन झाले नाही आहे तर अकलूजला पाणी पुरवठा करणा-या धरणाची पातळी कमी झाली.काही दिवसांनी माळशिरस तालुक्यात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार असून त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.अकलूज नगरपरिषदे करिता पाणी पुरवठा वीर धरणातून होतो पण सध्याची विझोरी येथील साठवण तलावातील पाण्याची स्थिती पाहून अकलूज नगरपरिषदे मार्फत पाणी मागणी प्रस्ताव दिनांक २३ जून २०२६ रोजी पाटबंधारे विभागास पत्र पाठविण्यात आले आहे.सद्याच्या स्थितीत वीर धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे अकलूज नगरपरिषद साठवण तलावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.त्यामुळे सध्या साठवण तलावात पाणी उपलब्ध नाही.पाटबंधारे विभागाकडील माहितीनुसार दिनांक १२ जुलै २०२६ रोजी धरणातून पाणी सुटणार असून दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत अकलूज नगरपरिषद साठवण तलावात पाणी उपलब्ध होईल.सध्या अकलूज शहरात नगरपरिषदेकडील एकूण उपलब्ध ४६ बोअरवेल आहेत त्यापैकी चालू ३४ बोअरवेल वरती सार्वजनिक कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे तसेच १० टॅकरद्वारे ज्या परिसरात बोअरवेल उपलब्ध नाही तेथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वीर धरणातील पाणी उपलब्ध होईल तेव्हा अकलूजमधील सर्व नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल तसेच अकलूजच्या नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून नगरपरिषदेस सहकार्य करावे.असे आवाहन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button