solapur

कोचिंग क्लासेस मध्ये भाजपचे सुरक्षा जनजागृती अभियान

कोचिंग क्लासेस मध्ये भाजपचे सुरक्षा जनजागृती अभियान

संचार वृत्त अपडेट 

कोचिंग क्लासेसमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकलूज शहरातील विविध कोचिंग क्लासेसमध्ये सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत क्लासेसच्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन मार्ग आणि CCTV यंत्रणेची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी क्लासेसच्या संचालकांशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था, वर्गातील गर्दी, इमारतीची स्ट्रक्चरल सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची यंत्रणा याबत मार्गदर्शन करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांनी क्लासेस संचालकांना निवेदन देऊन प्रत्येक क्लासमध्ये अग्निशमन यंत्रणा, फर्स्ट एड बॉक्स, आपत्कालीन निर्गमन फलक आणि 24×7 CCTV कॅमेरे बसवणे अनिवार्य करावे, अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याचे आवाहनही करण्यात आले.विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत. कोचिंग क्लासेसमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळले जावेत यासाठी भाजप सातत्याने पाठपुरावा करणार आहे.असे यावेळी अमरसिंह देशमुख यांनी सांगितले.या अभियानाला क्लासेस संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सुरक्षा ऑडिट करून आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
अकलूज शहरातील विविध कोचिंग क्लासेसला प्रत्यक्ष भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सुरक्षा तपासणी चेकलिस्ट संदर्भात माहिती घेण्यात आली.आयकॉन सायन्स अकॅडमी,चंदनकर कोचिंग क्लासेस, व्यवहारे क्लासेस, स्पोकन इंग्लिश कोर्स क्लासेस,झोन झेस्ट कोचिंग सेंटर,आदी क्लासेस ला भेट देण्यात आली.भेटीदरम्यान इमारत सुरक्षा, अग्निसुरक्षा (Fire Safety), विद्युत सुरक्षा, आपत्कालीन तयारी, विद्यार्थी सुरक्षा आणि आवश्यक परवानग्या व कागदपत्रे याबाबींवर क्लासेस चे समाधान व्यवहारे व अमोल चंदनकर यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची सर्वोच्च जबाबदारी आहे. अकलूजमधील सर्वच कोचिंग क्लासेसने सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.या वेळी अमरसिंह देशमुख,दिपाली वाघमोडे नगरसेवक, अमर जाधव गोपालक, विनोद बडगुजर,संतोष वाघमोडे,मल्लिकार्जुन तलवार, व त्यांचे सहकारी पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button