पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची नियोजन बैठक संपन्न

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची नियोजन बैठक संपन्न
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर महिनाभर जनसंपर्क अभियान
संचार वृत्त अपडेट
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची ‘सेवा अभियानांतर्गत’ नियोजन बैठक पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज अकलूज येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
अकलूज येथील पाटीदार भवनात झालेल्या या बैठकीत केंद्र शासनाच्या १२ वर्षांच्या काळातील विविध विकास योजना आणि झालेल्या विकास कामांची माहिती थेट शेतकरी, महिला आणि युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महिनाभर सेवा अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.
या जिल्हा कार्यकारिणी बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विक्रम पावसकर, सदस्य मकरंद देशपांडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, आ. समाधान अवताडे, आ. जयकुमार गोरे यांच्यासह गणेश चिवटे, रणजित शिंदे, रश्मी बागल, रणवीर राऊत, प्रणव परिचारक, चेतन केदार, सचिन शिंदे, राजकुमार पाटील, बाबाराजे देशमुख, श्रीकांत देशमुख, सुजयसिंह माने-पाटील, अमित टिळेकर,यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान प्रादेशिक कार्यकारिणीने सेवा पंधरवडा साजरा करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून उच्चपदी निवड होऊन२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ‘सेवा अभियान’ मोहिमेंतर्गत महिनाभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियानात केंद्र शासनाच्या विविध विकास योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठीच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्यासाठी नियोजनात्मक कार्यक्रम ठरविण्यात आले. प्रत्येक मंडल आणि बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवावा, अशा सूचना यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.



