स्मशानभूमीत लाईट नसल्याने मृतांवर मोबाईल चे उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

स्मशानभूमीत लाईट नसल्याने मृतांवर मोबाईल चे उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ
संचार वृत्त अपडेट
श्रीपूर मध्ये स्मशानभूमीत गेले वर्षभरापासून लाईटची सोय नसल्याने येथील मृतांवर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यासाठी खूपच अडचणी येत आहेत संध्याकाळी लाईट ची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नातेवाईक व नागरिकांना मोबाईल चे उजेडात अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली आहे नगरपंचायतचे माध्यमातून येथे स्मशानभूमीत लाईट पाणी स्वच्छता यांची कसलीही व्यवस्था नाही दुर्देव असे की स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वेड्या बाभळी च्या फांद्या आडव्या येत असल्याने अक्षरशः प्रेत घेऊन जाणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे नागरिकांना त्या काटेरी फांद्या अंगाला लागत आहेत मृत व्यक्तीच्या तोंडाला स्पर्श होत आहे स्मशानभूमीत सर्वत्र पालापाचोळा खुरटे गवत वाढले आहे स्मशानभूमीत निदान आठवड्यात एकदा तरी साफसफाई स्वच्छता झाली पाहिजे परंतु या कडे वर्ष वर्ष नगरपंचायत लक्ष्य देत नाही निदान मरणाचा सोहळा तरी व्यवस्थित व्हायला हवा परंतु येथे नगरपंचायत चे अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना मरणानंतरही अवहेलना उपेक्षा वाट्याला येत आहेत हे दुर्दैव आहे नगरपंचायत चे मुख्याधिकारी बांधकाम इंजिनिअर स्वच्छता आरोग्य विभागात काम करणारे वरिष्ठ अधिकारी येथे वास्तव्यास नसतात त्यामुळे त्यांना येथील रहिवासी यांच्या अडचणी समस्या यांचे देणं घेणं नसल्याने ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे येथील स्थानिक नगरसेवक हे कमालीचे उदासीन व निष्क्रिय असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा दररोज सामना करावा लागतो वास्तविक पाहता आज जग कुठे चालले आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र होत असताना श्रीपूर मध्ये मात्र स्मशानभूमीत लाईट पाणी स्वच्छता रस्ता दुरुस्ती ही समस्या आजही भेडसावत आहे हे कशाचे लक्षण समजायचे एरवी गावात मोठमोठ्या चर्चा गप्पा मारणारे कार्यक्रमात सत्कार समारंभ यातच गुंग होऊन नागरिकांना तोंडाला पाने पुसत असतील तर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत स्मशानभूमी देखभाल दुरुस्ती स्वच्छता लाईट पाणी यांवर असणारा निधी याचे काय केले जाते असा सवाल नागरिक विचारत आहेत.



