मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त नमो उद्यानात दीपप्रज्वलन ; २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेप्रती कृतज्ञता

मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त नमो उद्यानात दीपप्रज्वलन ; २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेप्रती कृतज्ञता !
अकलूज मध्ये मोदींच्या सेवेला उजेडातून अभिवादन !
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर राबविण्यात आलेल्या ‘एक दिवा आशीर्वादाचा, विकसित भारताच्या संकल्पाचा, २५ वर्षांच्या सेवेच्या सन्मानाचा’ या उपक्रमांतर्गत अकलूज येथे उत्साहात दीपप्रज्वलन करण्यात आले. अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलातील ‘नमो उद्यान’ येथे बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता हा उपक्रम पार पडला.

यावेळी मंडल अध्यक्ष सुजय माने पाटील,सचिन शिंदे,महादेव कावळे, नगरसेवक महेश शिंदे, राहुल लोंढे, जयश्री एकतपुरे,दिपाली वाघमोडे,अमरसिंह देशमुख,दिपाली देशमुख,सरचिटणीस अमित टिळेकर,उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, अमोल माने,निलेश ननवरे,आदी सह सर्व भाजप चे पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेप्रती नमन केले तसेच त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात ‘आशीर्वादाचा दिवा’ यासह विविध सेवा व जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश आहे.
नमो उद्यानात झालेल्या दीपप्रज्वलनामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘सेवेला साधना मानणारे मोदीजी’ या भावनेतून आयोजित या उपक्रमात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकसित भारताच्या संकल्पासाठी एकजुटीने योगदान देण्याचा संदेश दिला.
देशभरात १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्याचे भाजपकडून आवाहन करण्यात आले होते.



