solapur
गिरझणीचे माजी सरपंच भरत वाघ यांचे निधन

गिरझणीचे माजी सरपंच भरत वाघ यांचे निधन
संचार वृत्त अपडेट
अकलूज/प्रतिनिधी
गिरझणी गावाचे माजी सरपंच व उत्कृष्ट मल्ल म्हणुन परिचित असलेले भरत साहेबराव वाघ याचे अल्पशा आजाराने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. गिरझणी येथे त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गिरझणी गावच्या राजकारणात अनेक वर्ष त्यांचे वर्चस्व होते,तसेच लाल मातीतील उत्कृष्ट मल्ल म्हणुनही त्यांची ख्याती होती.सहकार महर्षी कारखान्याचे संचालक म्हणुनही त्यांनी काम पाहीले. गिरझणी गावचे सरपंच म्हणुन त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांच्या निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन,दोन मुली,जावई नातवंडे असा परिवार आहे.गिरझणी (वाघवस्ती) येथील त्यांचे शेतात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.