आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करावा भारत बंदला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जाहीर पाठिंबा
अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करा 21 ऑगस्टच्या भारत बंदला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जाहीर पाठिंबा
संचार वृत्त
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 21 डिसेंबरच्या भारत बंदला जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदन महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.सदरचे निवेदन अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे निवेदनामध्ये 1 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा व क्रीमीलेअर संदर्भात दिलेला निर्णय हा असंविधानिक व असामाजिक फूट पाडणारा असा आहे सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक ठरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त केला जात आहे तेव्हा या घातक निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विशेषण संसदीय अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात येत असून आजच्या 21 ऑगस्ट 2024 रोजीच्या भारत बंदलाही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका खजिनदार विश्वास उघाडे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे, तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार सहसरचिटणीस समाधान मदने तालुका खजिनदार मल्हारी चव्हाण तालुका युवक संघटक कबीर मुलानी आकाश गायकवाड अजय साळुंखे संदीप तोरणे दीपक शिरतोडे तानाजी धनवडे नवनाथ भोसले प्रवीण महिडा योगेश डावरे अभिषेक पवार शिवाजी कांबळे आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.