solapur

पाटबंधारे खात्याच्या लेखी आश्वासनानंतर गणेश इंगळे व आशु भाऊ ढवळे यांचे गणेशगांव बंधाऱ्यावरील अन्नत्याग आंदोलन मागे

पाटबंधारे खात्याच्या लेखी आश्वासनानंतर गणेश इंगळे व आशु भाऊ ढवळे यांचे गणेशगांव बंधाऱ्यावरील अन्नत्याग आंदोलन मागे

संचार वृत्त अपडेट 

निरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा गणेशगांव बंधारा हा गेली 2022 मध्ये पुराच्या पाण्याने वाहून गेला होता .त्याकडे पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष्य केले होते. नोव्हेंबर 2024 पासून गणेश इंगळे यांनी सतत वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने करून त्या वाहून गेलेल्या बंधाऱ्यावर पाटबंधारे खात्याकडून मुर्मीकरून करून घेतले व त्या बांधाऱ्याचे टेंडर ही करून घेतली .ते टेंडर 7 एप्रिल 2025 रोजी ओपन होऊन ते टेंडर अनुष्का असोसिएट कंपनी अकोले खुर्द ता माढा या कंपनीने घेतले होते. या कंपनीने गेली दीड महिना झाले काम चालू केले नव्हते म्हणून युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व माळशिरस तालुका मराठा सेवक आशुभाऊ ढवळे यांनी 19 जुन 2025 रोजी सकाळी 10 वाजले पासून अन्नत्याग आंदोलन गणेशगांव बंधाऱ्यावर चालू केले होते.पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अधिकारी जडे साहेब यांनी उपोषण स्थळी 19 तारखेला दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत थांबून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आंदोलक तात्काळ काम चालू करावे या मागणी वरती ठाम होते .शुक्रवार दि 20 रोजी नवनियुक्त उपविभागीय अधिकारी अ अ दातीर यांनी स्थळ पाहणी करून निरा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाला की तात्काळ काम चालू करून ते काम दीड महिन्यात पूर्ण करतो आणी चालू हंगामातील 2025 -26 रब्बी हंगामासाठी 2.5 ते 3 मिटर शासन धोरणानुसार पाणी अडवून देतो असे लेखी आश्वासन गणेशगांव तांबवे गिरवी या गावातील शेतकऱ्यांन समोर आंदोलकांना दिले तेंव्हा गावाकऱ्यांन समोर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी अ अ दातीर साहेब यांच्या हस्ते व आशुभाऊ ढवळे यांनी गणेशगांव चे सरपंच नजीर शेख व माजी सरपंच दादासाहेब नलवडे यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन आंदोलन थांबवले यावेळी शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर तांबवे गावचे बाळासाहेब काकडे शीतल इनामदार शहाजी कदम संभाजी इनामदार जिजाऊ ब्रिगेड च्या शारदा चव्हाण सतीश काकडे पोपट रुपनवर पोलीस पाटील भाईसाब शेख मेघराज ताटे देशमुख मनोहर यादव अप्पासाहेब महाडिक अप्पासाहेब शेंडगे माऊली मदने गणेश यादव अमीर कोरबू बालम कोरबू सागर मोरे ओंकार पाटील हारून कोरबू शब्बीर शेख विजय यादव सैफुल शेख गणेश जाधव हुमाईन शेख अमीर शेख सागर मोहिते नसीर शेख मंगेश यादव भारत यादव भारत पराडे कल्याण पराडे संजय पराडे राजू शेख गुलाब शेख नूरजहान शेख जावेद शेख ई ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button